IPL Auction 2025 Live

लोकप्रिय बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजात्या यांचे मुंबईत निधन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ निर्माते आणि राजश्री फिल्मचे संस्थापक राजकुमार बडजात्या यांचे निधन झाले आहे.

Rajkumar Barjatya no more (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील ज्येष्ठ, लोकप्रिय निर्माते आणि राजश्री फिल्मचे संस्थापक राजकुमार बडजात्या (Rajkumar Barjatya) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये (Sir H. N. Reliance Foundation Hospital) त्यांनी आज (21/2/2019) सकाळी अखरेचा श्वास घेतला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे ते वडील होते.

ट्रेंड अनालिस्ट तरण आदर्शने ट्विट करत ही माहिती दिली. तरणने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "राजकुमार बडजात्या यांच्या निधनाची बातमी विचलित करणारी आणि दुःख देणारी आहे... राज बाबू असे त्यांना प्रेमाने म्हणत... एक अतिशय मस्त बोलणारा माणूस होता... सूरज, बडजात्या कुटुंब आणि राजश्री परिवाराचे सांत्वन..."

'पिया का घर', 'हम आपके है कौन...!', 'हम साथ साथ है', 'हम प्यार तुम्ही से कर बैठे', 'मैं प्रेम की दिवानी हूं', 'विवाह', यांसारखे अनेक सुपरहीट सिनेमांची त्यांनी निर्मिती केली होती. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा 'हम चार' सिनेमाचेही ते निर्माते होते.  या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक दीक्षित यांनी केले आहे.

राजकुमार बडजात्या यांनी महेश भट्ट यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि त्यानंतर दिग्दर्शनाच्या पर्दापणातच 'मैंने प्यार किया' सारखा सुपरहीट सिनेमा त्यांनी रसिकांच्या भेटीला आणला.