वाढदिवसानिमित्त Farhan Akhtar चा गर्लफ्रेंड Shibani Dandekar सोबत गुपचूप साखरपुडा ?
Farhan Akhtar and Shibani Dandekar (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र वाढदिवसापेक्षा फरहान एका खास गोष्टीमुळे चर्चेत आहे. ती म्हणजे मॉडेल शिबानी दांडेकरसोबतचे (Shibani Dandekar) त्याचे खास नाते. आज वाढदिवसानिमित्त दोघंही गुपचूप साखरपुडा करणार असल्याचीही चर्चा आहे.

पूर्वाश्रमीची पत्नी अधुना भबानीपासून (Adhuna Bhabani) विभक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा फरहान संसार थाटण्याच्या तयारीत आहे. आज वाढदिवसानिमित्त साखरपुडा करून मार्च-एप्रिलमध्ये हे दोघेही विवाहबद्ध होतील, अशी चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

Is it the weekend yet?? #thatbrowngirl dress by @allthingssilai

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 

View this post on Instagram

 

oh Hi @faroutakhtar #bumped

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 

View this post on Instagram

 

@shibanidandekar

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

यापूर्वी सोशल मीडिया पोस्टमधून त्यांच्या नात्याचा इशारा अनेकदा मिळाला आहे.  शिबानी आणि फरहानची मुले यांच्यातही चांगली मैत्री असल्याचे समजतेय. त्यामुळे लवकरच शिबानी-फरहान नव्या संसाराला सुरुवात करतील. मात्र शिबानी-फरहान या रिलेशनशीपवर पुढे काय निर्णय घेणार, याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.