Emergency Movie Get Censor Certificate: कंगना रणौतला दिलासा, इमर्जन्सी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं U/A सर्टिफिकेट दिलं
रिलीजपूर्वी इमर्जन्सी चित्रपटात 10 मोठे बदल करावे लागणार आहेत.
कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. इमर्जन्सी चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता, आता या चित्रपटात काही बदल केल्यानंतर सेन्सॉरनं या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे. सेन्सॉर बोर्डानं इमर्जन्सी चित्रपटाला U/A सर्टिफिकेट दिलं आहे. सेन्सॉर बोर्डाने (CBFC) इमर्जन्सी चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिलं आहे. यासोबतच चित्रपटातील काही सीन्स काढून टाकावे लागणार आहे. पंरतू या निर्णयामुळे कंगना रणौतला मोठा दिलासा मिळाला आहे. या चित्रपटामुळे झालेल्या वादाचा फायदा देखील या चित्रपटाला मिळण्याची शक्यता आहे. ( हेही वाचा - Emergency चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; कंगनाला धक्का)
या बदलांसोबतच चित्रपटात जिथे वादग्रस्त विधाने असतील तिथे वस्तुस्थिती दाखवावी, असंही सेन्सॉर बोर्डाने म्हटलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड मिलहॉस निक्सन यांनी भारतीय महिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे आणि कुठे ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टल चर्चिल यांनी भारतीय सशांसह पुनरुत्पादन करतात असे विधान केले आहे. या विधानाची सूत्रे दाखवावे लागणार आहे.
इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट आधी लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता, मात्र त्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता निर्माते कधी हा चित्रपट प्रदर्शित करतात हे पहावे लागणार आहे.