Dussehra 2020: अभिनेता रितेश देशमुख ने आपल्या पत्नी आणि मुलांसह केली दस-याची पूजा, गायत्री मंत्र बोलताना रायन-राहिल चा सुंदर Video केला शेअर
तर जेनेलिया त्यांच्या बाजूला बसली आहे. या व्हिडिओमध्ये रायन आणि राहिल सुंदर असा गायत्री मंत्र म्हटला आहे
आज विजयादशमी (Vijayadashami) निमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. आज घराघरात शस्त्रे, हत्यारांची पूजा केली जाते. पाटीवर सरस्वतीचे चित्र काढून त्याची व पुस्तकांची पूजा केली आहे. हा उत्साह सामान्यांसह सेलिब्रिटींच्या घरांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. मराठी आणि हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याच्या घरी देखील दस-याच्या (Dussehra) निमित्ताने पूजा करण्यात आली. आपली पत्नी जेनेलिया (Genelia Deshmukh) आणि मुले रायन (Rayan) आणि राहिल (Rahil) सह दस-याची पूजा करतानाचा एक सुंदर व्हिडिओ रितेश देशमुख ने नुकताच पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये रितेशची मुले रायन आणि राहिल रितेशसह आरती करताना दिसत आहे. तर जेनेलिया त्यांच्या बाजूला बसली आहे. या व्हिडिओमध्ये रायन आणि राहिल सुंदर असा गायत्री मंत्र म्हटला आहे. विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त मुलगा रितेश ने वडिलांच्या पोशाखासह केले असे काही जे पाहून डोळ्यांच्या कडा ओलावतील, पाहा भावूक व्हिडिओ
पाहा व्हिडिओ
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा देशमुख सोशल मिडियावर बेरच सक्रिय असतात. आपले एकाहून एक सुंदर, रोमँटिक व्हिडिओ ते शेअर करत असतात. त्याचबरोबर त्या दोघांचे तसेच कुटूंबासोबतचे फोटो देखील ते शेअर करत असतात. रितेश आणि जेनेलिया हे बॉलिवूडमधील क्यूट कपल्स पैकी एक आहे. त्यामुळे त्यांनी शेअर केलेले फोटोज आणि व्हिडिओज प्रचंड व्हायरल होत असतात. रितेशचा हा दसरा पूजेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून तासाभरात या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
रितेश आणि जेनेलिया या दोघांचा सोशल मिडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे या दोघांना अनेकजण फॉलो करतात. नुकताच रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ केदारनाथ मंदिराचा (Kedarnath Temple) असून त्यातील दृश्यं विलोभनीय आहे.