Burj Khalifa Honours Shah Rukh Khan: शाहरुख खान ला वाढदिवसाच्या दिवशी बुर्ज खलिफाकडून मिळाला 'हा' मोठा सन्मान; पहा व्हिडिओ

जगातील नामांकित बुर्ज खलिफा (Burj Khalifa) बिल्डिंगवर शाहरुखचे फोटो आणि जबरदस्त लाईट शो पाहायला मिळाला. बुर्ज खलिफावर शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शाहरुखलादेखील या सन्मानाने खूप आनंद झाला आहे.

शाहरुख खान (Photo Credits: Twitter)

Burj Khalifa Honours Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) केवळ भारतातचं नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. नुकत्याचं त्यांच्या 55 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला दुबईहूनही खूप प्रेम आणि आदर मिळाला. जगातील नामांकित बुर्ज खलिफा (Burj Khalifa) बिल्डिंगवर शाहरुखचे फोटो आणि जबरदस्त लाईट शो पाहायला मिळाला. बुर्ज खलिफावर शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शाहरुखलादेखील या सन्मानाने खूप आनंद झाला. त्यामुळे त्याने बुर्ज खलिफासोबतचा एक फोटो सोशल मीडियावरही शेअर केला.

शाहरुखने सोमवारी आपला 55 वा वाढदिवस सेलेब्रेट केला. या दिवशी शाहरुखला त्यांच्या जगभरातील फॅन्सने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना संकटामुळे यंदा शाहरुखचा वाढदिवस वर्चुअली साजरा करण्यात आला. यंदा त्याचा वाढदिवस खूपचं आनंददायी झाला. कारण, दुबईच्या प्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीवर शाहरुखचे फोटो झळकले. इमारतीवर वेगवेगळ्या लाईट शोचं आयोजन करून शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. (हेही वाचा - Aishwarya Rai ने मुलगी Aaradhya सोबतचे खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे मानले आभार)

बुर्ज खलिफा इन्स्टाग्राम व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

#BurjKhalifa adds sparkle to the birthday celebration of the Baadshah of Bollywood! Happy birthday @iamsrk! #ShahRukhKhan احتفالاتنا بعيد ميلاد نجم بوليوود وملكها، شاروخان، لا يمكن أن تمر دون أن نضيء #برج_خليفة لنهنئه على طريقتنا! كل عام وأنت بخير!

A post shared by Burj Khalifa (@burjkhalifa) on

बुर्ज खलिफा समोर पोझ देताना शाहरुखने ट्विटरवर आपला फोटो शेअर करताना म्हटलं की, "मला जगातील सर्वात लांब आणि सर्वात मोठ्या स्क्रीनवर पाहून खूप आनंद झाला. माझा मित्र मोहम्मद अल्बरने माझ्या पुढच्या चित्रपटापूर्वी मला स्क्रिनिंग आणलं. धन्यवाद आणि बुर्ज खलिफा, एमार दुबई, तुम्हा सर्वांचे माझे खूप खूप प्रेम. माझ्या मुलांना दुबई मधील अतिथी म्हणून प्रभावित केलं असून हे मला खूप आवडलं आहे."

कोरोनामुळे यंदा चाहते शाहरुखला प्रत्यक्ष पाहू शकले नाहीत. परंतु, त्याच्या फॅन क्लबने त्याचा वाढदिवस खास करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यात भाग घेतला. शाहरुखने स्वत: च्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या प्रेमाबद्दल आनंद व्यक्त करणारा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ज्यात तो वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या हितचिंतकांचे आभार मानताना दिसत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now