Malayalam Actor Vinayakan Misbehave at Hyderabad Airport: मद्यधुंद मल्याळम अभिनेता विनायकनचे हैदराबाद विमानतळावर गैरवर्तन; अभिनेत्याला अटक

इंडिगोच्या गेट स्टाफसोबत अभिनेत्याने गैरवर्तन केले. यावेळी विनायकन मद्यधुंद अवस्थेत होता. बराच गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला अटक करून गुन्हा दाखल केला. ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, जेलर फेम अभिनेता हैदराबादहून गोव्याला जात होता.

Malayalam Actor Vinayakan Misbehave at Hyderabad Airport: मद्यधुंद मल्याळम अभिनेता विनायकनचे हैदराबाद विमानतळावर गैरवर्तन; अभिनेत्याला अटक
Malayalam Actor Vinayakan (Photo Credit - Instagram)

Malayalam Actor Vinayakan Misbehave at Hyderabad Airport: रजनीकांत स्टारर 'जेलर' मधील अभिनेता विनायकन (Malayalam Actor Vinayakan) सध्या चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनायकनला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अभिनेत्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विमानतळावर दारूच्या नशेत विनायकनने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गैरवर्तन केले. त्यामुळे पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, इंडिगोच्या गेट स्टाफसोबत अभिनेत्याने गैरवर्तन केले. यावेळी विनायकन मद्यधुंद अवस्थेत होता. बराच गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला अटक करून गुन्हा दाखल केला. ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, जेलर फेम अभिनेता हैदराबादहून गोव्याला जात होता. तथापी, अभिनेत्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विमानतळावर जमिनीवर शर्टलेस बसलेला दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडीओमध्ये तो ओरडताना आणि गोंधळ घालताना पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - Devara Trailer Update: 10 सप्टेंबरला रिलीज होणार 'देवरा'चा ट्रेलर, नवीन पोस्टर शेअर करून निर्मात्यांनी दिली माहिती (View Poster))

 

View this post on Instagram

 

A post shared by Tk Vinayakan (@actorvinayakan)

विनायकनला सूचना देऊनही तो गोंधळ घालतचं होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या CISF च्या टीमने त्याला अटक केली. यानंतर अभिनेत्याला स्थानिक विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हैदराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याबाबत माहिती देताना पोलीस ठाण्याचे सीआय बलराज यांनी सांगितलं की, या प्रकरणी अनिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासही सुरू करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2024 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).