Drugs Case: सारा अली खान गोव्याहून मुंबईत दाखल; 26 सप्टेंबर रोजी होणार NCB चौकशी

त्यामुळे NCB कडून या अभिनेत्रींची चौकशी करण्यात येणार आहे.

Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा (Susshant Singh Rajput Case) तपास ड्रग्सच्या अनुषंगाने होत असून यात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्धी अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. त्यामुळे NCB कडून या अभिनेत्रींची चौकशी करण्यात येणार आहे. यात सारा अली खान (Sara Ali Khan) हिचे नावही असून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने तिला समन्स बजावला आहे. चौकशीसाठी 26 सप्टेंबर रोजी साराला NCB समोर हजर व्हायचे आहे. यासाठी सारा, आई अमृता सिंह (Amrita Singh) सोबत आज (24 सप्टेंबर) गोव्याहून (Goa) मुंबईत (Mumbai) दाखल झाली.

26 सप्टेंबर रोजी सारा अली खान हिची नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्स संबंधित चौकशी होणार आहे. दरम्यान, ड्रग्स संबंधित चौकशीसाठी दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर यांनाही समन्स बजावण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, उद्या दीपिका पदुकोणची NCB कडून चौकशी केली जाणार आहे. (NCB Summons Deepika Padukone's Manager: ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश ला समन्स)

ANI Tweet:

सारा अली खान हिचा गोवा एअरपोर्टवरील फोटो ANI ने ट्विट केला होता.

ANI_HindiNews Tweet:

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ड्रग्सच्या दिशेने सुरु झाल्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांचे ड्रग्स संबंधित चॅट्स उघडकीस आले. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली. आतापर्यंत सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात NCB ने 18 लोकांना अटक केली आहे.