मद्य सेवनाने कोरोना विषाणू पोटातच नष्ट होतो? कार्तिक आर्यन याच्या प्रश्नावर डॉक्टरांनी सांगितले सत्य
त्यामुळे या गंभीर परिस्थितीत विविध माध्यमातून जनजागृती करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यात बॉलिवूड सेलिब्रिटीही महत्त्वपूर्ण सहभाग घेत आहेत. यात अभिनेता कार्तिक आर्यन देखील सहभागी झाला आहे.
भारत देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीत विविध माध्यमातून जनजागृती करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यात बॉलिवूड सेलिब्रिटीही महत्त्वपूर्ण सहभाग घेत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) देखील यात सहभागी झाला आहे. कार्तिक इंस्टाग्रामवर कोकी पूछेगा (Koki Puchhega) नावाचा शो होस्ट करत आहे. या शो द्वारे लोकांमध्ये कोविड 19 संबंधित जागरुकता निर्माण केली जात आहे. कोरोना संबंधित प्रश्न, शंका लोकांच्या मनात आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे देवून शंका निरसन करण्याचे काम या शो द्वारे करण्यात येत आहे. या शोचा दुसरा एपिसोड अलिकडेच प्रदर्शित झाला. या एपिसोड मध्ये कार्तिकने लोकांच्या मनातील अनेक प्रश्न डॉक्टरांना विचारले आणि डॉक्टरांनी त्याची उत्तरे दिली. यात कार्तिकने डॉ. मीमांसा बुच यांना प्रश्न विचारले आणि हा व्हिडिओ इंस्टाग्रावर शेअर केला आहे.
'कोकी पूछेगा' या शो च्या दुसऱ्या एपिसोड मध्ये कार्तिकने डॉक्टरांना विचारले की, "कोरोना व्हायरस उष्ण ठिकाणी मरण पावतो?" यावर डॉक्टर म्हणाले की, "ही एक अफवा आहे." त्यानंतर कार्तिकने विचारले की, "मद्यसेवन केल्याने कोरोना व्हायरस पोटातच मरण पावतो?" यावर ही देखील एक अफवा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. Lock Down काळात बॉलिवूड सेलिब्रिटी बनले शेफ; दीपिका पादुकोण, कार्तिक आर्यन सहित 'या' मंडळींनी बनवल्या लज्जतदार रेसिपी (See Photos)
पहा व्हिडिओ:
तसंच लहान मुलांना कोरोनाची लागण होत नाही तसंच चायनीज फूड खाल्याने कोरोनाची बाधा होते? यावर यात काहीही तथ्य नसून या सर्व अफवा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर कार्तिक आर्यन तुमचा आवडता अभिनेता आहे का? असे कार्तिकने विचारताच डॉक्टर म्हणाल्या, "हा हे खरे आहे." सोशल मीडियावर कार्तिकचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. या व्हिडिओ द्वारे मनोरंजनासह कोरोना व्हायरस संबंधित महत्त्वपूर्ण माहिती लोकांना मिळत आहे.