Akanksha Chamola Reels: मांजरीच्या पिल्लूला घृणास्पद वागणुक, अभिनेत्री आकांक्षा चमोलाचा रिल्सचा नेटकऱ्यांचा संताप (Watch Video)

तिच्या नुकत्याच प्रसारित केलेल्या रिलमुळे तीला चर्चेत आली आहे. रिलमध्ये तीने एक मांजरांचे पिल्लू हातात घेतले आहे.

Akanksha Chamola PC TW

Akanksha Chamola Reels: रिल्स काढण्यासाठी लोक काय करतील याचे नेम नाही. अनुपमा मालिकेतील अभिनेता गौरव खन्ना याची पत्नी आकांक्षा चमोला सद्या रिल्समुळे चर्चेत आली आहे. तिच्या नुकत्याच प्रसारित केलेल्या रिलमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रिलमध्ये तीने एक मांजरांचे पिल्लू हातात घेतले आहे. काही वेळानंतर ते पिल्लू ती खाली फेकते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या असंवेदनशील कृत्याबद्दल तिच्यावर टीका केली आहे. (हेही वाचा-गुजरात पोलिसांकडून Godhra Examination Centre वर राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा मध्ये गैरव्यवहार प्रकरणी 5 जणांना केली अटक;)

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा इन्स्टाग्रामवर वेगवेगळी रिल्स शेअर करत असते. तीने नुकताच शेअर केलेल्या रिल्समुळे संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आकांक्षा मांजरीच्या पिल्लूसोबत आहे. मांजरीचे पिल्लू धरून तीने चुंबन घेतले. त्यानंतर तीनं ते जमिनीवर टाकले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमींनी संताप व्यक्त केला. रिल्ससाठी लोक काहीही करतील असं नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केल्या आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. हे प्राणी मज्जा करण्यासाठी नसतात असे करू नका असं एका नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अशी कृत्य खरोखर मृर्खपणाची आहे असं दुसऱ्या नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आकांक्षाचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. छोट्या पडद्यावर आपली जादू कायम ठेवली परंतु या व्हिडिओमुळे ती वाद्याच्या भोवऱ्यात अडकली आहे.