'भारत' चित्रपटातील सलमानचा आणखी एक हटके लूक आऊट, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सोशल मिडियावर शेअर केला फोटो
दिग्दर्शक अली अब्बास जफरने (Ali Abbas Zafar)नुकताच सलमानचा 'भारत' चित्रपटातील सलमानचा दमदार लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे
सध्या चर्चा सुरु आहे ती सलमानच्या नवीन चित्रपट 'भारत'(Bharat) सिनेमाची. प्रदर्शनापूर्वीच ह्या चित्रपटाच्या नवनवीन गोष्टी रिलीज होतायत. मग त्यात गाणी असो वा चित्रपटातील कलाकारांचा लूक. सलमानच्या चाहत्यांमध्ये ह्या चित्रपटाची उत्सुकता वाढवण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने (Ali Abbas Zafar)नुकताच सलमानचा 'भारत' चित्रपटातील सलमानचा दमदार लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे. ह्या फोटोमध्ये भाईजानने इंडियन नेव्हीचा पोशाख घातला आहे.
बॉलिवूडचा दबंग स्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमीच आपल्या नवनवीन चित्रपटातील भूमिकेसाठी चर्चेत असतो. मात्र सध्या तो चर्चेत आहे तो त्याच्या आगामी चित्रपट 'भारत' साठी. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यातच भर म्हणून ह्या चित्रपटातील सलमानचा हटके लूक दिग्दर्शक अली अब्बास यांनी शेअर केला आहे. ह्या लूकला चाहत्यांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहे. एकूणच चाहत्यांच्या येणा-या सकारात्मक कमेंटवरुन ह्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये किती उत्सुकता आहे हे दिसून येतय.
'भारत' सिनेमात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भारताच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे, अशी या सिनेमाची कथा आहे.
ह्या चित्रपटाता सलमान सोबत दिशा पटानी(Disha Patani), कैटरीना कैफ (Katrina Kaif), जॅकी श्रॉफ(Jackie Shroff) , नोरा फतेही(Nora Fatehi) , सुनील ग्रोव्हर(Sunil Grover) आणि तब्बू (Tabbu) अशी कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे. भारत सिनेमात अॅक्शन, रोमान्स आणि देशभक्ती पाहायला मिळणार आहे आणि चार टप्प्यात या सिनेमाची कथा उलगडण्यात येणार आहे.
हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे. ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.