Dil Ka Darwaaza Khol Na Darling First Look: 'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग' चा फर्स्ट लूक प्रदर्शित; जया बच्चन, सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत
2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रेम आणि हास्याचे एक आगळेवेगळे मिश्रण आहे.
'क्वीन "आणि' सुपर 30" सारख्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध चित्रपट निर्माता विकास बहल (Vikas Bahl) 'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग" (Dil Ka Darwaaza Khol Na Darling) चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रिकरण आणि इतर बाबींवर सध्या काम सुरु असून हा चित्रपट 2025 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि वामिका गब्बी (Wamiqa Gabbi) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट निर्मात्याने सदर सिनेमाचे पोस्टर गुरुवारी (14 नोव्हेंबर) लॉन्च केले. ज्यामध्ये सहकलाकार वामिका गब्बी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासमवेत संगीत बँडचे नेतृत्व करताना जया बच्चन या पोस्टरमध्ये गतिशील, रॉक 'एन' रोल अवतारात दिसत आहेत. पोस्टर पाहून चित्रपटाची संकल्पना आणि कथानकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असल्याचे सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियेतून पाहायला मिळत आहे.
चावी फिरवायला तयार आहात का?
निर्मात्याच्या वतीने सोशल मीडियावर इंग्रजीत केलेल्या पोस्टचा मराठी भावार्थ असा की,अनलॉक लव्ह अँड लाफ्टर, दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग 2025 मध्ये पडद्यावर येत आहे! तुम्ही चावी फिरवायला तयार आहात का? दरम्यान, या पोस्टला चाहत्यांनीही मजेशीर आणि उत्साहाने प्रतिसाद दिला, एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, "हे मजेदार दिसते", तर दुसऱ्याने लिहिले, "Let’s goooooooo!!!!"
गुड कंपनी प्रॉडक्शनचा चित्रपट
टिप्स फिल्म्स लिमिटेड, बवेजा स्टुडिओज लिमिटेड आणि जम्पिंग टोमेटो स्टुडिओज यांनी सादर केलेला 'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग "हा विकास बहल दिग्दर्शित गुड कंपनी प्रॉडक्शनचा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती उद्योगातील दिग्गज रमेश तौरानी, हरमन बवेजा, रोहनदीप सिंग, विराज सावंत आणि रमेश पुलपाका यांनी केली आहे. वामिका गब्बीने गोव्यातील तिच्या पडद्यामागील अनुभवाची झलक शेअर केली आणि इन्स्टाग्राम स्टोरीवर #Day 1 #NewBeginnings #Goa असे हॅशटॅगही दिले.
'बेबी जॉन' मध्ये वरुण धवनसोबत वामिका गब्बीचा आगामी प्रोजेक्ट
'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग' व्यतिरिक्त, वामिका गब्बी वरुण धवनसोबत 'बेबी जॉन' मध्ये आणखी एका मोठ्या उपक्रमात झळकणार आहे, जो भावनिक स्वरांसह एक तीव्र अॅक्शन ड्रामा आहे. निर्मात्यांनी अलीकडेच धवनला एक निर्भय पोलिस अधिकारी आणि एकटे वडील म्हणून दाखवणारा एक टीझर प्रदर्शित केला. या टीझरमध्ये ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनाही खलनायकाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आणि कीर्ती सुरेशला मुख्य नायिकेच्या भूमिकेत सादर करण्यात आले.