Radhe Song Dil De Diya Teaser: राधे चित्रपटातील 'दिल दे दिया' गाण्याचा टीजर आला समोर, भाईजानसह जैकलीन फर्नांडिस लावणार ठुमके

हे गाणे कमाल खान आणि पायल देव यांनी गायिले आहे.

Dil De Diya Song Teaser in Radhe (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याचा आगामी चित्रपट 'राधे: युअर मोस्ट वाँटेड भाई' (Radhe: Your Most Wanted Bhai) हा चित्रपट रमझान ईदच्या मुहूर्तावर ओटीटी माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या असंख्य चाहते त्याच्या या चित्रपटाती आतुरतेने वाट पाहात आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर आणि सीटी मार हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. याला युट्यूबवर चाहत्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला. तसेच या सिनेमाबद्दलची उत्सुकता देखील आणखीन वाढली. दरम्यान या चित्रपटातील आणखी एका गाण्याचा टीजर समोर आला आहे. 'दिल दे दिया' (Dil De Diya) असे या गाण्याचे बोल असून उद्या हे गाणे प्रदर्शित होणार आहे.

राधे चित्रपटातील 'दिल दे दिया' या गाण्यामध्ये दिशा पटानी नाही तर जैकलिन फर्नांडिस (Jacqeline Fernandes) सलमानासह ठुमके देताना दिसणारा आहे. हे गाणे कमाल खान आणि पायल देव यांनी गायिले आहे.हेदेखील वाचा- Radhe Song Seeti Maar: 'राधे' सिनेमातील Salman Khan, Disha Patani यांच्या धमाकेदार अंदाजातील 'सीटी मार' गाणं प्रदर्शित (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

हिमेश रेशमिया या गाण्याचे संगीतकार आहे तर शब्बीर अहमद या गाण्याचे गीतकार आहे. टीजर वरून जैकलीन या गाण्यामध्ये वेगवेगळ्या हॉट लूक्समध्ये दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच सिनेमाच्या निर्मात्यांकडून ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला होता. गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाची पटकथा बेतलेली आहे. सलमान पुन्हा अ‍ॅक्शनपट अंदाजामध्ये या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. लॉकडाऊन मुळे यंदा हा सिनेमा थिएटर ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सलमानचा ओटीटी वर प्रदर्शित होणारा राधे हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे 13 मे ला ईदच्या पार्श्वभूमीवर आता हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी पूर्ण सज्ज आहे.