Dia Mirza-Vaibhav Rekhi Wedding: दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली अभिनेत्री दिया मिर्झा; बॉयफ्रेंड 'वैभव रेखी'सोबत बांधली गाठ, पहा नव्या जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ
लग्नाच्या पाच वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती. ऑगस्ट 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दिने वैभव रेखीला डेट करण्यास सुरवात केली
व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवसानंतर बॉलिवूड फिल्म अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. व्यवसायिक वैभव रेखीशी (Vaibhav Rekhi) तिने लग्न केले आहे. दीया मिर्झाच्या या भव्य लग्नाकडे गेले काही दिवस सर्वांचेच लक्ष होते. याआधी लग्नाच्या तयारीचे अनेक फोटो समोर आले होते, आता त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. दीयाने स्वत: मीडियामध्ये या लग्नाची माहिती दिली आहे. दिया मिर्झाप्रमाणे वैभव रेखीचेही हे दुसरे लग्न आहे. आधीच्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे.
लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र दियाच्या ब्रायडल लूकची चर्चा आहे. दियाने लग्नात एक सुंदर लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. सोबत अगदी मोजकेच दागिने होते, गळ्यास हार, मांगटिका, झुमके आणि हातात बांगड्या असे काही दागिने तिने घातले होते. यासोबत तिने खाद्यावरून पदर घेतला होता ज्यामुळे तिचे सौंदर्य अजूनच उठून दिसत होते. दियाचा नवरा वैभवच्या लूकबद्दल बोलायचे तर त्याने अगदी साधा पांढरा कुर्ता पायजामा घातला होता व डोक्यावर गोल्डन पगडी होती. लग्नानंतर दोघांनाही माध्यमांसमोर येऊन मिठाई वाटली.
याआधी दियाच्या मेहंदीचे फोटो समोर आले होते. यासह लग्नाच्या ठिकाणाचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते. दियाचे लग्न हा एक खासगी समारंभ होता, यामध्ये केवळ तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सामील होते. (हेही वाचा: Neha Pendse साठी तिच्या पती शार्दुलने फुलांच्या पायघड्या घालून Valentine's Day ला दिले 'हे' सरप्राईज, Watch Video)
दरम्यान, दिया मिर्झाने यापूर्वी व्यावसायिक साहिल संघाशी लग्न केले होते. लग्नाच्या पाच वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती. ऑगस्ट 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दिने वैभव रेखीला डेट करण्यास सुरवात केली. वैभव हा मुंबईस्थित उद्योगपती, आर्थिक गुंतवणूकदार आणि पिरामल फंड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा संस्थापक आहे. वैभवने पूर्वी योग आणि वेलनेस प्रॅक्टिशनर सुनैना रेखाशी लग्न केले होते असे काही माध्यमांनी सांगितले आहे. दरम्यान, सध्या 39 वर्षांची असलेल्या दियाला 2001 च्या ‘रहना है तेरे दिल में’ मधून बरीच प्रसिद्धी मिळाली होती.