दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी यांचा 'छपाक' सिनेमातील Kissing Scene लीक (Viral Video)
या सिनेमातील दीपिका आणि विक्रांत यांची किसिंग सीन लिक झाला. पहा व्हिडिओ...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या आगामी 'छपाक' (Chhapaak) सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिल्लीत या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण सोबत विक्रांत मेसी (Vikrant Massey) प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमाच्या सेटवरुन अनेक फोटोज, व्हिडिओज समोर आले आहेत. या सिनेमातील दीपिका पदुकोणचा लूक पाहुन तिला ओळखणे कठीण होत आहे. आता या सिनेमातील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत दीपिका आणि विक्रांत एकमेकांना किस करताना दिसत आहेत. (छपाक सिनेमातील लक्ष्मीचा लूक साकारण्यासाठी 'दीपिका पदुकोण' ला लागले तब्बल इतके तास)
यात सीनमध्ये दीपिकाने पिंक कलरचा सूट घातला आहे तर विक्रांत कुर्त्यामध्ये दिसत आहे. या दोघांना पाहुन आजूबाजूला गर्दी जमा झाली आणि त्यांनी केलेला कल्ला व्हिडिओत ऐकू येत आहे. ('छपाक' मधील भुमिकेच्या रुपात एकटीच रस्त्यावर उभी दिसली दीपिका पादुकोण, लोकांनी ओळखलेच नाही)
पहा व्हिडिओ:
मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमात दीपिका पदुकोण अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल हिची भूमिका साकारत आहे. फॉक्स स्टार स्टूडियोज, केए एंटरटेनमेंट आणि मृग फिल्म्स यांनी एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती सुत्रं सांभाळली आहेत. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.