दीपिका पादुकोणला आवडलं सोनाली कुलकर्णी ने बनविलेले हे अस्सल 'महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण'; अशा शब्दांत मानले आभार

सोनाली कुलकर्णी हिने स्वत:च्या हाताने बनवलेले जेवण दीपिकाला खाऊ घातले. हे जेवण दीपिकाला प्रचंड आवडले असून तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन सोनालीचे कौतुक केले आहे.

Deepika and Sonali (Photo Credits: Instagram)

जगात असं कोणी सापडणार नाही ज्याला महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण आवडणार नाही. अगदी देशविदेशापर्यंत आपल्या मराठमोळ्या जेवणाची ख्याती पसरली आहे. मग यात बॉलिवूड सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील. तसे सोनम कपूर पासून अक्षय कुमार, सलमान खान सर्वांनाच महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण आवडते. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिला या महाराष्ट्रीयन जेवणाची भुरळ पडली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिच्या हातचा एक महाराष्ट्रीय पदार्थ चाखून दीपिका अक्षरश: वेडी झाली आहे. आपल्या सोशल अकाउंटवरुन तिने या पदार्थाचे कौतुक केले असून तिने सोनाली कुलक्णी खास शब्दांत आभार मानले आहे.

दीपिकाला आवडलेले हे महाराष्ट्रीन जेवण म्हणजे 'वरण-भात'. सोनाली कुलकर्णी हिने स्वत:च्या हाताने बनवलेले जेवण दीपिकाला खाऊ घातले. हे जेवण दीपिकाला प्रचंड आवडले असून तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन सोनालीचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

@sonalikul I’m holding you to the ‘veren’ & ‘bhat’ (maharashtrian meal) offer!Thank You for your love and energy!❤️ #chhapaak #10thjanuary #chhapaakpromotions

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

हेदेखील वाचा- Chhapaak Official Trailer: दीपिका पादुकोण च्या दमदार अभिनयाचा 'छपाक' चा ट्रेलर आऊट; अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जिद्दीची उलगडणार प्रेरणादायी कहाणी

तू केलेल्या या आदरातिथ्याबद्दल तुझे आभार असे कॅप्शन दीपिकाने या फोटोखाली लिहिले आहे.

येत्या 10 जानेवारीला दीपिका चा 'छपाक' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सर्वांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. अॅसिड हल्ला तरुणी लक्ष्मी अग्रवाल हिच्या सोबत झाली ती दुर्दैवी घटना आणि त्या घटनेनंतर तिने सुरु केलेला लढा या ट्रेलरमधून दाखविण्यात आला आहे. अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यांच्या कडा ओलावणारा या ट्रेलरमध्ये दीपिकाच्या दमदार अभिनयाची झलकही पाहायला मिळेल. मेघना गुलझार (Meghna Gulzar) दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलर ने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.