दीपिका पादुकोण पोहचली JNU मध्ये; नोंदवला विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध, पहा Video

यामध्ये बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणही (Deepika Padukone) जेएनयू विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ, जेएनयूमध्ये पोहोचली आहे.

Deepika Padukone (Photo Credits: Twitter)

जेएनयू (JNU) हल्ल्याबाबत सर्वत्र विरोध होत आहे. या हल्ल्यानंतर लगेचच सोशल मीडियावरही लोकांनी तीव्र विरोध दर्शविला. देशभरातील अनेक लोक रस्त्यावर निषेध करताना दिसले. यामध्ये बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणही (Deepika Padukone) जेएनयू विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ, जेएनयूमध्ये पोहोचली आहे. जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ पार पडलेल्या मेळाव्यात ती सामील झाली. दीपिका 7 जानेवारी रोजी साबरमती टी पॉईंटला पोहोचली आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला. काल याचबाबत आपलाही निषेध नोंदवण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap)आणि अनुभव सिन्हा यांच्यासह अनेक चित्रपट सेलेब्ज, मुंबईतील (Mumbai) कार्टर रोड येथे जमले होते.

यापूर्वी जेएनयूमधील हिंसाचाराबद्दल दीपिकाला प्रश्न विचारला असता ती म्हणाली, 'आम्ही स्वतःला व्यक्त करण्यास घाबरत नाही याचा मला गर्व आहे. जे कोणी स्वतःची मते व्यक्त करत आहे त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे. मला वाटते की आता आपली विचारधारा काहीही असो मात्र आम्ही देश आणि त्याच्या भविष्याबद्दल विचार करीत आहोत  आणि ही चांगली गोष्ट आहे.' दरम्यान आज दीपिकाने हिंसाचारात जखमी झालेल्या जेएनयू छात्र संघटनेचे (जेएनयूएसयू) आइशी घोष यांचीही भेट घेतली. (हेही वाचा: JNU मधील हल्ल्याच्या निषेधार्थ चित्रपट सेलिब्रिटींंनी नोंदवला निषेध; रिचा चड्ढा, विशाल भारद्वाज, तापसी पन्नू, दिया मिर्झा, अनुराग कश्यप आदींचा सहभाग)

जेएनयू येथे घडलेल्या गोष्टीच्या निषेधार्थ जे बॉलिवूड सेलिब्रिटी कालच्या अन्द्लनात सामील झाले होते, त्यांमध्ये तापसी पन्नू, दिया मिर्झा, अनुराग कश्यप, दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेता राहुल बोस, अभिनेत्री गौहर खान, सुप्रसिद्ध स्टॅंड-अप कॉमेडियन कुणाल कामरा, दिग्दर्शक वासन बाला, हंसल मेहता, चित्रपट निर्माते झोया अख्तर आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांची नावे आहेत.