Deepika-Ranveer Wedding: दीपवीर आज 'या' वेळेला शेअर करणार लग्नाचे फोटोज!
बॉलिवूडचे स्टार कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग काल इटलीतील सुंदर व्हिलामध्ये विवाहबद्ध झाले.
बॉलिवूडचे स्टार कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग काल इटलीतील सुंदर व्हिलामध्ये विवाहबद्ध झाले. काल कोंकणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर आज सिंधी पद्धतीने पुन्हा विवाहसोहळा रंगणार आहे. चाहत्यांना या लग्नसोहळ्याची खूप उत्सुकता होती. मात्र दीपिका-रणवीरच्या नियमांमुळे चाहत्यांना या बहुचर्चित लग्नाचे फोटोज पाहायला मिळाले नाहीत. पण आज सिंधी पद्धतीने विवाह पार पडल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता दीपवीर आपल्या लग्नाचे फोटोज शेअर करतील. पाहा- दीपिका-रणवीर विवाहसोहळ्यातील व्हिडिओ
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका-रणवीर देखील आपल्या लग्नाचे फोटोज चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहेत. पण सिंधी पद्धतीने विवाह केल्यानंतर हे दोघेही फोटोज सोशल मीडियावर शेअर करतील. विशाल पांडे दीपवीर यांच्या लग्नाचे ऑफिशिअल फोटोग्राफर आहे. त्यामुळे विशालशी चर्चा केल्यानंतर दीपवीर यांनी हा निर्णय घेतला आहे.
तर तुम्ही अजून थोडी उत्सुकता ताणून धरा आणि संध्याकाळची वाट पाहा. संध्याकाळी 6 वाजता दीपवीर यांच्या 'रॉयल वेडिंग'चे फोटोज चाहत्यांना पाहायला मिळतील.
(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2018 10:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

