Remo D'souza Health Update: रेमो डिसूझा याच्या प्रकृतीबाबत त्याची पत्नी लिझेलने दिली 'अशी' माहिती

रेमोला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Remo Dsouza (Photo Credits-Twitter)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसूझा (D'Souza) याला शुक्रवारी (11 डिसेंबर) हृदयविकाराचा झटका आला. रेमोला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या बातमीनंतर रेमो यांच्या चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रेमोची पत्नी लिझेलने त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. ‘रेमोच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून तो सध्या ठिक आहे’ असे लिझेन म्हणाल्या आहेत. तसेच रेमोला रुग्णालयातून कधी डिस्चार्ज देण्यात येणार? याबाबत त्या उद्या डॉक्टर निर्णय घेणार आहेत, असेही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, रेमो यांच्या तब्यतेची चौकशी करण्यासाठी बॉलिवूड कोरियोग्राफर धर्मेश, कृति महेश आणि अभिनेता आमिर अली कोकिलाबेन रुग्णालयात त्याला भेटायला गेले होते. रेमो ची प्रकृती आता स्थिर आहे, असे धर्मेश म्हणाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेमो याच्या हृदयातील ब्लॉकेजेस काढण्यासाठी त्याच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर निगराणीसाठी त्याला आयसीयूत ठेवण्यात आले आहे. हे देखील वाचा- Remo D'souza Health Update: रेमो डिसूजा याला पाहण्यासाठी कोरियोग्राफर धर्मेश आणि अभिनेता आमिर अली कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल; प्रकृतीबद्दल दिली 'ही' महत्त्वाची माहिती (Watch Videos)

रेमो यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच त्याच्या अनेक चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. तसेच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करु लागले. त्याचबरोबर शक्ती मोहन, अदनान सामी, उर्वशी रौतेला आणि गुरु रंधावा यांच्या समवेत अन्य सेलिब्रिटींनी रेमोच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा देणारे ट्विट केले होते.