Coronavirus मुळे मिळालेल्या वेळचा सलमान खान ने 'असा' केला उपयोग; पहा ही अप्रतिम कलाकृती
त्याने आपल्याला मिळालेल्या या वेळेत आपली पेंटिंगची आवड पूर्ण केली आहे. काही तासांच्या आधी सलमानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) अधिकाधिक घरी राहा अशा सूचना दिल्या असताना घरी राहून नेमकं करायचं काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना? तुमच्या आमच्या सारखाच हा प्रश्न सेलिब्रिटी मंडळींच्या समोर सुद्धा उभा ठाकला आहे. यावर उत्तर म्हणून अनेकांनी आपल्या पद्धतीने आपला 'मी टाइम' एन्जॉय करण्यास आता सुरुवात केली आहे. कोरोनामुळे अश्याच प्रकारे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सुद्धा घरात अडकून पडला होता. त्याने आपल्याला मिळालेल्या या वेळेत आपली पेंटिंगची आवड पूर्ण केली आहे. काही तासांच्या आधी सलमानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे जिम बंद; बॉलिवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ने शेअर हॉट योगा व्हिडीओ; Watch Video
सलमान खान याने आपल्या फॅन्स सोबत शेतर केलेल्या या व्हिडीओ मध्ये तो अगदी सराईत पणे स्केचिंग करताना दिसून येत आहे, यापूर्वी सुद्धा अनेकदा त्याने असे व्हिडीओ शेअर केले आहेत, सलमान एक उत्तम चित्रकार आहे याची ही झलक म्हणता येईल.
सलमान खान पोस्ट
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण हिने आपण आपला वेळ कशी स्वतःची काळजी घेण्यात घालवत आहोत हे दाखवणारे काही फोटो पोस्ट केले होते तर करीनाने आपण अनायसे मिळालेला हा वेळ इंस्टाग्राम शिकण्यासाठी वापरात आहोत असे सांगितले होते. एकूण काय तर प्रत्येक जण घरच्या घरी काही ना काही मार्गाने आपला वेळ घालवत आहे. हाच आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडणे टाळा आणि घरात असताना आपली आवड किंवा काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यात वेळ घालवा. तुमचा हा प्लॅन आमच्यासोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका.