Coronavirus Outbreak: कोरोनामुळे घरात अडकलेली कतरिना कैफ घेतेय भांडी कशी घासावीत याचे धडे (Watch Video)

कोरोनामुळे घरात अडकलेल्या कतरीना कैफ (Katrina Kaif) हिने सुद्धा आपला वेळ काही तरी नवीन करण्यासाठी वापरण्याचे ठरवले आहे, ती आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेकडून चक्क भांडी कशी घासावीत याचे धडे घेते आहे.

Katrina Kaif (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)  पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊनचे (Lock Down) आदेश देण्यात आले आहेत, अशा वेळी घरात एरवी अगदी कमी वेळासाठी घरात असणारी बॉलिवूड कर मंडळी सुद्धा आता 31 मार्च पर्यंत घरात अडकली आहे. त्यामुळे स्वाभाविक वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर सुद्धा उभा आहे. अशावेळी काही जण आपला वेळ सेल्फ केअर साठी वापरत आहेत तर काहींनी आपली आवड जोपासण्यासाठी वेळ खर्ची करण्याचे ठरवले आहे. यातच कोरोनामुळे घरात अडकलेल्या कतरीना कैफ (Katrina Kaif) हिने सुद्धा आपला वेळ काही तरी नवीन करण्यासाठी वापरण्याचे ठरवले आहे, ती आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेकडून चक्क भांडी कशी घासावीत याचे धडे घेते आहे. यावेळी प्रत्यक्ष भांडी घासतानाचा एक व्हिडीओ सुद्धा काढून तिने सोशल मीडियावर आपल्या फॅन्स सोबत शेअर केला आहे. Coronavirus चा प्रार्दुभाव टाळण्यासाठी दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा ने स्विकारले #HandWashChallenge, Watch Video

कतरिना ने स्वतः भांडी घासतानाचा व्हिडीओ शेअर करताना त्याखाली कॅप्शन सुद्धा अतिशय छान लिहिले आहे, "🍽 +🧽=🙂🏠अशा ईमोजी वापरून त्यापुढे तिने ही काम करताना आपल्याला रोज मदत करणाऱ्यांची किंमत सुद्धा जाणवून येते असे म्हंटले आहे, तसेच रोज आपल्यासाठी काम करणाऱ्या सर्व मंडळींचे तिने आभार मानले आहेत.बॉलिवूडच्या अवार्ड शो पासून ते सिनेमापर्यंत सर्वत्र ग्लॅमर्स आणि हॉट अंदाजात वावरणाऱ्या कट्रिनाचा हा अंदाज सुद्धा तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

कुशल बद्रिके याने कुटूंबांसोबत गायलेले 'Go Coronia' हे भन्नाट गाणे तुम्ही ऐकले का? मोकळ्या वेळेत घरी Creativity करण्याचा चाहत्यांना दिला सल्ला

कतरीना कैफ इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

🍽 +🧽=🙂🏠 really makes u appreciate all the help we have at home #socialdistancing #staysafe #helpoutathome

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण हिने सुद्धा घरातील मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपले कपाट आवरतानाचा फोटो शेअर केला होता, तर सलमान खान याने सुद्धा स्केचिंग करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता, या सर्व कलाकारांनी अलीकडेच एक व्हिडीओ च्या माध्यमातून सर्व नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले होते. आम्ही घरी राहात आहोत तुम्हीही घरीच थांबा असे ही सारीच मंडळी आपल्या फॅन्सना संदेश देताना दिसत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now