IIFA 2020 पुरस्कार सोहळ्यावर कोरोना व्हायरसचं सावट; इंदौर मधील 27-29 मार्च दरम्यान आयोजित कार्यक्रम पुढे ढकलला

IIFA Awards 2020 (Photo Credits: Twitter)

Coronavirus Outbreak:  जगभरात दहशत निर्माण करणार्‍या कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीचं सावट यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यावरही दिसून आलं आहे. दरम्यान मार्च 2020 च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित International Indian Film Academy Awards सध्या पुढे ढकलण्यात आला आहे. आयफा 2020 चं आयोजन यंदा मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलं होतं. मात्र COVID19 virus चे रूग्ण उत्तर भारतामध्ये आढळल्याने आता आयफा पुरस्कार सोहळा यंदा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. यंदा इंदौरमध्ये 27-29 मार्च या कालावधीमध्ये आयफा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केले होते.

केंद्रीय आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 31 वर पोहचली आहे. तर जगात कोरोनाने 3200 पेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता खबरदारीचे उपाय घेण्यास सुरूवात झाली आहे. आयफा पुरस्कारासाठी मध्य प्रदेशात विविध ठिकाणी हॉटेल बुकिंग्स करण्यात आली होती. ती देखील आता रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

ANI Tweet

यंदा होळी आणि धुळवडीच्या सणावरही कोरोना व्हायरसचं सावट आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा सह दिल्लीमध्ये अनेक मान्यवरांनी होली मिलन सेलिब्रेशनपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मराठी कलाकारांनी देखील कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर होळी खेळणं टाळलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif