Coronavirus Lockdown काळात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा एकत्रित वॉक? पहा Viral Video

मात्र रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या एका व्हिडिओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Ranbir Kapoor & Alia Bhatt (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता कहर पाहता 25 मार्च रोजी भारत देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही वारंवार करण्यात येत आहे. मोदींच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी स्वागत केले असून घराबाहेर न पडण्याचे आवाहनही बॉलिवूड कलाकारांकडून करण्यात येत आहे. मात्र रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या एका व्हिडिओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या रणवीर-आलिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात ते दोघेही लॉकडाऊन असताना आपल्या कुत्र्यासह बाहेर फिरताना दिसत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात हा व्हिडिओ समोर आल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे कळेलेले नाही. काही दिवासांपूर्वी आलियाने आपल्या कुत्र्यासह एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर सध्या आलिया कुत्र्यासह वेळ घालवत असल्याचेही बोलले जात होते. (Lockdown काळात दारूची दुकाने सुरु ठेवा! या मागणीच्या ट्विट मुळे ऋषी कपूर वादाच्या भोवऱ्यात)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

#Aliabhatt #RanbirKapoor

A post shared by Entertainment Fan Page (@facc2911) on

अयान मुखर्जी यांच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र झळकणार आहेत. हा सिनेमा या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार असून सध्या कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे याचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. या सिनेमात रणबीर-आलिया यांच्या सह अमिताभ बच्चन, मौनी रॉय, शाहरुख खान, नागार्जुन यांसारखे कलाकारही आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif