Coronavirus: अजय देवगणची धारावीसाठी मोठी मदत; नवीन रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर आणि व्हेंटिलेटर केले दान
सध्याची बिकट परिस्थिती पाहता, या विषाणू विरूद्धच्या युद्धात जवळजवळ प्रत्येकजण देशासोबत उभा आहे. बॉलिवूड स्टार्सबद्दल बोलायचे झाले तर,
आजकाल संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाशी झगडत आहे. सध्याची बिकट परिस्थिती पाहता, या विषाणू विरूद्धच्या युद्धात जवळजवळ प्रत्येकजण देशासोबत उभा आहे. बॉलिवूड स्टार्सबद्दल बोलायचे झाले तर, इंडस्ट्रीशी संबंधित अनेक सेलेब्जनी त्यांच्या वतीने या लढाईत योगदान दिले आहे व देत आहेत. कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून या विषाणूपासून बचावासाठी लोकांना जागरूक करत आहे, तर कोणी या युद्धामध्ये आर्थिक हातभार लावत आहे. नुकतेच बॉलिवूडचा स्टार अजय देवगण (Ajay Devgn) ने या लढ्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी माहिती समोर आली आहे.
अजय देवगनने मुंबईचा प्रसिद्ध झोपडपट्टी भाग धारावीसाठी मोठी मदत केली आहे. व्हायरल भयानीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगणने कोणालाही कळू न देता देणगी दिली आहे. या पोस्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार- 'अजय देवगणने धारावीतील रुग्णालयांसाठी 200 बेड, ऑक्सिजन सिलिंडर आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था केली आहे. बीएमसीने या झोपडपट्टीसाठी 15 दिवसांत हे कोरोना विषाणूसंबंधित स्वतंत्र रुग्णालय सुरू केले आहे. अजय देवगणमे धारावीच्या 700 कुटुंबांना रेशन किट देखील दान केले आहे. (हेही वाचा: सोनू सूद ला एका चिमुकलीने आपल्या वडिलांच्या वतीने केली 'ही' प्रांजळ विनंती, ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही)
आशियामधील सर्वात मोठ्या मुंबईच्या धारावी (Dharavi) झोपडपट्टीमध्ये कोरोना शिरकाव झाल्यानंतर, दररोज इथल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या विषाणूमुळे मुंबईसह महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक स्टारही सध्याच्या परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका ट्वीटद्वारे अजय देवगणने अधिकाधिक लोकांना धारावीच्या मदतीसाठी पुढे येण्याची विनंती केली होती.
सिनेमा , मालिकांचे चित्रीकरण करण्यास परवानगी ; नियमांच पालन करणे बंधनकारक - Watch Video
दरम्यान, धारावी मधील नवे रुग्णालय हे 4000 चौरस मीटर क्षेत्रात बांधले गेले आहे. ही जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मालकीची आहे. येथे बनविलेल्या हॉस्पिटलमध्ये धारावीच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत.