Fact Check: पिठाच्या पिशवीतून पैसे वाटणारी व्यक्ती आमिर खान नाही; स्वतः ट्विट करून दिले स्पष्टीकरण, See Tweet

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये असे दिसून आले होती की, गरजू लोकांसाठी वाटण्यात आलेल्या पिठाच्या पिशवीमध्ये (Wheat Bags) पैसे वाटण्यात आले आहेत

Aamir Khan (Image Credit: Stock Images)

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये असे दिसून आले होती की, गरजू लोकांसाठी वाटण्यात आलेल्या पिठाच्या पिशवीमध्ये (Wheat Bags) पैसे वाटण्यात आले आहेत. बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याने लोकांच्या मदतीसाठी ही अनोखी पद्धत अवलंबली असल्याचा दावा केला गेला होता. मात्र आता आमिर खानने याबाबत ट्विट करत आपण असली कोणतीही गोष्ट केली नसल्याचे सांगितले आहे. स्वतः आमिर खानने ही गोष्ट सांगितल्यामुळे या व्हायरल व्हिडिओमागील सत्य बाहेर आले आहे.

हा व्हिडिओ अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहे. याच्या सत्येतेबाबत कोणतीही पुष्टी झाली नव्हती. टिक टॉकवरही दावा केला होता की, आमिरनेच गव्हाच्या पिठाने भरलेल्या पिशव्यांमध्ये पैसे भरून ते गरिबांना वाटले. व्हिडिओनुसार 23 एप्रिल रोजी हा ट्रक दिल्लीतील गरीबांच्या वसाहतीत आला होता. काही ठिकाणी हा ट्रक मुंबई येथे आला असल्याचे सांगितले गेले होते. या उदार कामामागे आमिरचा हात असल्याचे बोलले गेले होते. कोविड-19 या आपत्ती काळात खरोखरच गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ही युक्ती केली गेली असे सांगण्यात आले.

आता आमिरने यामागे आपला हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, ‘मित्रांनो, गव्हाच्या पिशव्यांमध्ये पैसे वाटणारी व्यक्ती मी नाही. ही एकतर पूर्णपणे बनावट कथा आहे, किंवा कोणीतरी असा रॉबिन हूड आहे जो स्वत:ची ओळख उघड करू इच्छित नाही! सुरक्षित राहा, सर्वांना प्रेम... आमीर’ (हेही वाचा: मजूरांना घरी जाण्यासाठी मोफत रेल्वे सेवा देण्यात यावी: बॉलिवुड अभिनेता रितेश देशमुखने शेअर केला मन हेलावून टाकणार फोटो)

तर अशा प्रकारे आमीरने हे कृत्य केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सध्याच्या संकटाचा फायदा घेत अनेक फेक मेसेजेस अथवा व्हिडिओज व्हायरल होत आहेत मात्र त्यावर अंकुश लावण्याचे काम सरकार करत आहे.



संबंधित बातम्या