Complaint Against Ranbir Kapoor: बॉलिवूड स्टार रणबीर कपुरविरोधात तक्रार दाखल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

या घटनेनंतर बॉलिवूड क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Ranbir Kapoor | Twitter
Complaint Against Ranbir Kapoor: बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपुर याचाविरुध्द मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. या घटनेनंतर बॉलिवूड क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ख्रिसमसच्या निमित्ताने रणबीर कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओवरून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी रणबीर कपुर विरुध्दात तक्रार दाखल करण्यात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  झाला होता, नेटकऱ्यांनी देखील व्हिडिओवर अनेक कंमेट केल्या. हिंदू धर्मिय लोकांच्या भावाना दुखावल्याचे कमेंटमध्ये सांगण्यात आले. (हेही वाचा- 'मेरी ख्रिसमस' चं टायटल ट्रॅक रिलीज, विजय सेतुपती आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रणबीर कपुर आपल्या कुटुंबियासोबत ख्रिसमस पार्टीचे सेलिब्रिशन करत होता, दरम्यान त्याने केकवर दारू ओतली आणि 'जय माता दी' असा नारा लावला. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला बरीच टीका केली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका वकिलाने घाटकोपर पोलिस ठाण्यात या घटनेनंतर तक्रार केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse)

कलम २९५ ( कोणत्याही वर्गाचा धार्मिक भावनाचा हेतुपुस्पपर अपमान करणे, 298 धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर कोणताही शब्द वापरणे, 500 (अपमानित करणे) आणि 34 (सामान्य हेतूने पुढे करणे) आहेत. 'प्रतिबद्ध कायद्यानुसार एफआयआर नोंदवावा. अश्या कलमांद्वारा तक्रार नोंदवला गेला आहे. या घटनेनंतर रणबीरच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif