Chhapaak Official Trailer: दीपिका पादुकोण च्या दमदार अभिनयाचा 'छपाक' चा ट्रेलर आऊट; अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जिद्दीची उलगडणार प्रेरणादायी कहाणी

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिची प्रमुख भूमिका असलेला छपाक (Chhapaak) चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर प्रदर्शित झाला.

Chhapaak Trailer (Photo Credits: YouTube)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिची प्रमुख भूमिका असलेला छपाक (Chhapaak) चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर प्रदर्शित झाला. अॅसिड हल्ला तरुणी लक्ष्मी अग्रवाल हिच्या सोबत झाली ती दुर्दैवी घटना आणि त्या घटनेनंतर तिने सुरु केलेला लढा या ट्रेलरमधून दाखविण्यात आला आहे. अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यांच्या कडा ओलावणारा या ट्रेलरमध्ये दीपिकाच्या दमदार अभिनयाची झलकही पाहायला मिळेल. मेघना गुलझार (Meghna Gulzar) दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलर ने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

अॅसिड हल्ला पीडित तरुणीची भूमिका साकारताना दीपिकाने अभिनयापासून त्या मेकअपसाठी घेतलेली मेहनत तुम्हाला या ट्रेलरमधून दिसेल.

पाहा छपाक चा ट्रेलर:

हेदेखील वाचा- दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी यांचा 'छपाक' सिनेमातील Kissing Scene लीक (Viral Video)

या सिनेमात विक्रांत मेसी दीपिकाच्या (लक्ष्मीच्या) बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल.

न्युज 18 च्या रिपोर्टनुसार, लक्ष्मीचा लूक साकारण्यासाठी दीपिकला चार तास लागले. तसंच मेकअप उतरवण्यासाठी देखील खूप वेळ लागायचा. त्याचबरोबर दररोज शूटिंग दरम्यान सारखाच मेकअप होणे, हे देखील एक आव्हान होते. मात्र कसबी मेकअप आर्टिस्ट ही किमया अतिशय लिलया साधली.



संबंधित बातम्या

IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Scorecard, Stumps: दुसरऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले; जसप्रीत बुमराहने धडाकेबाज गोलंदाजी करत घेतले 5 बळी

NZ vs ENG, 3rd Test Match Day 2 Preview: इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारू शकतील का? की न्यूझीलंडचे गोलंदाज कहर करणार, दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी बॅटल आणि लाइव्ह स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून

South Africa vs Pakistan 3rd T20I 2024 Match Winner Prediction: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो

Babar Azam Milestone: बाबर आझमने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत सर्वात जलद 11,000 धावा करणारा खेळाडू ठरला