चेतन भगत ने '3 इडियट्स' साठी क्रेडिट न दिल्याने विधु विनोद चोपडा यांच्यावर लावले आरोप - त्यांच्यामुळे आत्महत्येच्या जवळ गेल्याची व्यक्त केली भावना
या वादामध्ये लेखक चेतन भगत यांनी देखील उडी घेत विधु विनोद चोप्रा यांच्यावर हल्लाबोल केला आहे
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता बॉलिवूडमध्ये नेपोटीझमवर चर्चा होत असल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. या वादामध्ये लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) यांनी देखील उडी घेत विधु विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोबतच सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा' सिनेमाच्या रिव्ह्यू बद्दल सिने समीक्षकांनी भान ठेवून लिहावं असं देखील आवाहन केले आहे. दरम्यान यामध्ये आता विधु विनोद चोप्रा यांची पत्नी आणि सिने समीक्षक अनुपमा चोप्रा यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर 'विधु विनोद चोप्रा यांच्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत पोहचला असल्याचं' चेतन भगत यांनी ट्वीट केले आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या फिल्मला घेऊन चेतनने पहिल्यांडा ट्वीट केले की तमाम सिने समीक्षकांना फटकारले. यामध्ये सुशांतची अखेरची फिल्म लास्ट विक रीलीज झाली आहे. सिने समीक्षकांना आवाहन करतो त्यांनी समझदारीने लिहावं. ओव्हर स्मार्ट बनू नका बकवास लिहू नका. घाणेरड्या ट्रिक्स वापरू नका. आधीच अनेकांची आयुष्य वाया गेली आहेत. असं त्यांनी लिहलं आहे.
चेतन भगत ट्वीट
अनुपमा चोप्रा प्रतिक्रिया
चेतनच्या या ट्वीटवर अनुपमा चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर पुन्हा चेतन भगतने ट्वीट केले. माझ्या कहाणी साठी मला क्रेडिट देण्यासाठी विधु विनोद चोप्रा यांनी नकार देत माझा अपमान केला होता. त्यांच्यामुळे माझ्या मनात आत्महत्येसारखे टोकाचे विचार आले होते. त्यावेळेस तुम्ही काही बघितलं नाही.
दरम्यान ट्वीटरवर अनेकांनी चेतन भगतच्या ट्वीट त्याला पाठिंबा देखील दाखवला आहे. त्याचे अनेक चाहते त्यांच्या या कृतीचंं उघडपणे कौतुकदेखील करत आहेत.