Indrani Mukherjee Documentary: नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जीचा माहितीपट अडचणीत, सीबीआयची सत्र न्यायालयात धाव
एस पी नाईक निंबाळकर यांच्या समोर आज सुनावणी झाली. सरकारी वकील सी जे नांदोडे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील आरोपींवर असलेला खटला पूर्ण होत नाही तोपर्यंत माहिती पटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी
शीना बोरा हत्याकांडावर आधारित 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथ' हा माहितीपट नेटफ्लिक्स वर 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोप इंद्राणी मुखर्जी हिची माहिती व हत्येच्या तपासाचा उलगडा या महितीपटात दाखवण्यात येणार आहे. मात्र आता या प्रेक्षेपणाच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सीबीआयने या महितीपटालाच आक्षेप घेतला आहे. माहितीपट प्रदर्शित करू नका अशी मागणी सीबीआयने केली असून न्यायालयात तशी याचिका दाखल करण्यात आली आहे. (हेही वाचा - The Indrani Mukerjea Story Buried Truth: शीना बोरा हत्याकांडावर आधारित द इंद्राणी मुखर्जी स्टोरी नावाची डॉक्यु सीरिजचा ट्रेलर रिलीज)
सीबीआयने केलेल्या अर्जावर विशेष कोर्टाचे न्या. एस पी नाईक निंबाळकर यांच्या समोर आज सुनावणी झाली. सरकारी वकील सी जे नांदोडे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील आरोपींवर असलेला खटला पूर्ण होत नाही तोपर्यंत माहिती पटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत नेटफ्लिक्स सह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले व या प्रकरणावरील सुनावणी 20 फेब्रुवारी पर्यंत तहकूब केली.
शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित द इंद्राणी मुखर्जी स्टोरी नावाची डॉक्यु सीरिज ही आता नेटफ्लिक्सवर येणार आहे. आता त्याचा ट्रेलर व्हायरल होत आहे. या सिरीजमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.