Case Filed Against Sapna Chaudhary: सपना चौधरीवर गुन्हा दाखल; वहिणीने केला मारहाण आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप
सपनाच्या वहिणीने पलवल महिला पोलिस ठाण्यात डान्सरसह तिची सासू नीलम आणि पती करण यांच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
Case Filed Against Sapna Chaudhary: हरियाणवी डान्सर सपना चौधरी (Sapna Chaudhary) पुन्हा एकदा वादात सापडली आहे. सपना तिच्या डान्समुळे अनेक वादांमुळे चर्चेत असते. सपनाबाबत पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. सपनाच्या वहिणीने पलवल महिला पोलिस ठाण्यात डान्सरसह तिची सासू नीलम आणि पती करण यांच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पलवल पोलिसांनी सपना चौधरीची आई नीलम आणि भाऊ करण यांच्याविरुद्ध हुंडाबळीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सपनाच्या वहिणीने तिच्या कुटुंबीयांवर क्रेटा कारची मागणी, मारहाण आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - Madhya Pradesh Shocker: अंधश्रद्धेचा कळस! उपचाराच्या नावाखाली 3 महिन्यांच्या चिमुरडीला गरम रॉडने 51 वेळा डागले; चिमुकलीचा मृत्यू)
सपनाच्या वहिणीने सासरच्या लोकांनी मारहाण करून हुंड्याची मागणी केली आणि मागणी पूर्ण न झाल्याने तिचा छळ आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तक्रारदाराने 2018 मध्ये सपनाचा भाऊ करणसोबत लग्न केले होत.
सपनाच्या वहिणीने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, मुलीच्या जन्मानंतर सासरच्या लोकांनी छळ चालू केला. तिच्या वडिलांनी तिला तीन लाख रुपये रोख, काही सोने, चांदी आणि कपडे दिले. घरच्यांकडून अशा भेटवस्तू मिळाल्यानंतरही सासरच्या मंडळींनी नाराजी दाखवत तिला पुन्हा शिवीगाळ करत गाडीची मागणी करण्यास सुरुवात केली. तर, 6 मे 2020 रोजी तिच्या पतीने (करण) दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार केला.
या संपूर्ण प्रकरणाबाबत महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी सुशीला म्हणाल्या, 'तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक सतेंद्र करत आहेत. आरोप निश्चित झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात येईल.'