Breast Milk Donation: एक दान असेही! लॉकडाऊनच्या काळात निर्माती Nidhi Parmar ने डोनेट केले 42 लिटर ब्रेस्ट मिल्क

पण एक अशी बॉलिवूड सेलिब्रिटी आहे या काळात जिने नवजात मुलांना वाचवण्यासाठी जवळजवळ 42 लिटर ब्रेस्ट मिल्क (Breast Milk), म्हणजेच स्वतःचे दुध दान केले आहे.

Nidhi Parmar Hiranandani (Photo Credit - Instagram)

लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सनी पैसे, रेशन, फूड पॅकेट्स, मास्क, पीपीई किट यांसारख्या वस्तू दान केल्या. पण एक अशी बॉलिवूड सेलिब्रिटी आहे या काळात जिने नवजात मुलांना वाचवण्यासाठी जवळजवळ 42 लिटर ब्रेस्ट मिल्क (Breast Milk), म्हणजेच स्वतःचे दुध दान केले आहे. आम्ही बोलत आहोत, तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर स्टारर चित्रपट ‘सांड की आंख' या चित्रपटाची निर्माती निधी परमार हिरानंदानी (Nidhi Parmar Hiranandani) हिच्याविषयी. 41 वर्षीय निधीने एका मुलाखतीत आपल्या या ब्रेस्ट मिल्क डोनेशनबद्दल माहिती दिली. यावर्षीच फेब्रुवारीमध्ये एका मुलाला जन्म देऊन निधि आई झाली होती.

आपल्या या कृत्याबद्दल निधी सांगते की, मुलाच्या जन्मापासूनच आपल्याला असे वाटत होते की, मुलगा जास्त दुध पीत नसल्याने मोठ्या प्रमाणात दुध वाया जात आहे. निधीने जास्त प्रमाणात दुध साठवून ठेवले होते जे निरर्थक होते. तिने याबद्दल पोर्टल बेटर इंडियाशी चर्चा केली. तसेच तिच्या वाचण्यात असेही आले की, फ्रीजमध्ये योग्य प्रकारे साठवल्यास आईच्या दुधाची तीन ते चार महिन्यांपर्यंत शेल्फ लाइफ असते. (हेही वाचा: अभिनेत्री Celina Jaitly ने गमावलेल्या बाळाची आठवण शेअर करत World Prematurity Day 2020 च्या निमित्ताने लिहली हृद्यद्रावक पोस्ट!)

निधी सांगते की, या दुधाचे काय करायचे यासाठी तिने तिच्या कुटूंबाकडे सल्ला मागितला, तर कोणी फेस पॅक बनवण्याचा सल्ला दिला, तर कोणीतरी बाळाला या दुधाने आंघोळ घालायला सांगितले. परंतु निधीला या दुधाचा योग्य प्रकारे वापर करायचा होता. त्यानंतर इंटरनेटवर सर्च केल्यावर तिला ब्रेस्ट मिल्क डोनेशनबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तिला एका स्त्रीरोगतज्ज्ञांने सूर्या रूग्णालयाबद्दल सांगितले. या ठिकाणी ब्रेस्ट मिल्क बँक आहे. त्यावेळी निधिकडे 150 मिलीची 20 पाकिटे होती, जी तिने या रुग्णालयात पुरवण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काळात रुग्णालयाने निधीला व्यवस्थित काळजी घेऊन पिक-अप सुविधा दिली, ज्याद्वारे निधीचे दुध लहान बाळांपर्यंत पोहोचले.

अहवालानुसार, सूर्या हॉस्पिटलमध्ये 2019 पासून ब्रेस्ट मिल्क बँक चालवली जात आहे. निधीच्या म्हणण्यानुसार, ब्रेस्ट मिल्कची बँक कशी कार्य करते हे पाहण्यासाठी जेव्हा ती रुग्णालयात पोहोचली, तेव्हा तिथे तिला जवळजवळ 60 अशी मुले आढळली त्यांना आईच्या दुधाची गरज होती.