Kangana Ranuat On Bramhastra: अभिनेत्री कंगणा रनौतकडून ऐका ब्रम्हास्त्र सिनेमाचा रिव्ह्यू, कणखर शब्दात घेतला दिग्दर्शकासह कलाकारांचा घेतला समाचार

ब्रम्हास्त्रचा रिव्ह्यू बॉलिवूडची क्वीन कंगणा रनौतने केला. या रिव्ह्यूतून कंगणाने ब्रम्हास्त्र सिनेमाचाचं नाही तर प्रोड्युसर करण जोहर , दिग्दर्शक आयान मुखर्जी आणि अभिनेत्री आलिया भट्टचासमाचार घेतला आहे.

काल बॉलवूडचा (Bollywood) बहूचर्चित सिनेमा ब्रम्हास्त्र (Bramhastra) प्रदर्शित झाला. सिनेमाबाबत दुहेरी प्रतिक्रीया उमटू लागल्या. काहींनी सिनेमाचं व्हिएफएक्स (VFX) तसेच अॅक्टींग (Acting) बाबत कौतुक केल आहे. तर सिनेमाची कथा (Story), संवाद (Conversation) याबाबत अनेकांनी आपली नापसंती दर्शवली आहे. विविध सिनेमा क्रिटीक (Movie Critic) कडून रिव्ह्यू (Review) करण्यात आला. पण ब्रम्हास्त्रचा रिव्ह्यू (Bramhastra Review) बॉलिवूडची (Bollywood) क्वीन कंगणा रनौतने (Kangana Ranut) केला. या रिव्ह्यूतून कंगणाने ब्रम्हास्त्र सिनेमाचाचं नाही तर प्रोड्युसर करण जोहर (Producer Karan Johar), दिग्दर्शक आयान मुखर्जी (Aayan Mukherjee) आणि अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) समाचार घेतला आहे. या संबंधीची कंगणाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी शेअर (Instagram Story Share) केली आहे. तरी फक्त बॉलिवूडमध्येच (Bollywood) नाही तर सोशल मिडीयावर (Social Media) कंगणाच्या या इंस्टाग्राम स्टोरीची जोरदार चर्चा होत आहे.

 

अभिनेत्री कंगणा रनौतने (Actress Kangana Ranuat)  या इंस्टाग्राम स्टोरीत (Instagram Story) लिहलं आहे प्रोड्युसर करण जोहरला (Karan Johar) त्याच्या सिनेमाच्या स्क्रीनपेक्षा (screen) अधिक इतरांच्या सेक्स लाईफमध्ये (Sex Life) अधिक रस आहे. यावेळी करण जोहरने त्याचा सिनेमा यशस्वी होण्याकरीता  दक्षिणात्य सिनेकलाकारांचा (South Film Stars) आणि हिंदू धर्माचा (Hindu Religion) वापर केला. अचानक सगळे हिंदू भक्त कसे झालेत असा सवाल विचारत कंगणाने करण जोहरवर निशाणा साधला आहे. (हे ही वाचा:- Kangana Ranaut On Mahesh Bhatt: दिग्दर्शक महेश भट्ट यांचं मूळ नाव अस्लम, अभिनेत्री कंगणा रनौतचा खळबळजनक दावा)

 

तसेच दिग्दर्शक अयान मुखर्जीला (Director Aayan Mukherjee) ताबडतोब तुरुंगात टाकण्याची मागणी कंगणाने केली आहे. पुर्वी या सिनेमाचं नाव जलालूद्दीन रुमी असं होत पण बाहूबली (Bahubali) सिनेमाच्या यशानंतर या सिनेमाचे नाव ब्रम्हास्त्र (Bramhastra) करण्यात आले,असा आरोप अभिनेत्री कंगणा रनौतने ब्रम्हास्त्र चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीवर केला आहे. तसेच अयानच्या या सिनेमामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असल्याचंही कंगनाने स्पष्ट केल आहे.  तसेच कंगणाने या इंस्टाग्राम  स्टोरी मधून अभिनेत्री आलिया भट्टवरही (Alia Bhatt) निशाणा साधला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now