Bramhastra: ब्रम्हास्त्रची छप्पर फाडके कमाई, तीन दिवसातचं 100 कोटींचा आकडा पार

दिग्दर्शक आयान मुखर्जीसह अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टला ब्रम्हास्त्र सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची प्रमुख भूमिका असलेला अयान मुखर्जी (Aayan Mukherjee) दिग्दर्शित ब्रह्मास्त्र (Bramhastra) चित्रपटने लवकरच ब्लॉकबस्टर (Blockbuster) ठरण्याच्या वाटेवर आहे. सुमारे 75 कोटी रुपयांच्या ओपनिंगनंतर (Opening), चित्रपटाने रविवारी सुमारे 39 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर इतर भाषांमधून 4 कोटी रुपयांची कमाई केली असुन रविवार एकूण 43 कोटी रुपयांची कमाई ब्रम्हास्त्रने केली आहे. ब्रह्मास्त्रची एकूण कमाई 100 कोटींपेक्षा अधिक झाली असली तरी चित्रपट 400 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला आहे, हे लक्षात घेता, त्याला ब्लॉकबस्टर घोषित करण्यासाठी येत्या आठवड्यातही प्रेक्षकांचा जम बसणं महत्वाचा आहे.

 

ब्रह्मास्त्र सिनेमाला (Bramhastra Movie) बॉलीवूडचं (Bollywood) वरदान म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही. कारण हिंदी चित्रपट (Hindi Cinema) उद्योगाने या वर्षी अनेक मोठ्या-बजेट फ्लॉप (Big Budget Flop) पाहिल्या आहेत ज्यात आमिर खानचा (Actor Amir Kahn) लाल सिंग चड्ढा (Lal Singh Chaddha) तसेच अक्षय कुमारचा (Akshay Kumar)  रक्षाबंधन (Raksha Bandhan), बच्चन पांडे (Bachchan Pandey), सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) किंवा रणबीरचा (Ranbir Kapoor) मागील रिलीज (Release) शमशेरा (Shamsheraa). पण ब्रम्हास्त्रने मात्र बॉयकॉट ट्रेन्डवर (Boycott Trend) मात करत जोरदार कामगिरी केल्याचं चित्र आहे. (हे ही वाचा:- Salman Khan: सलमान खानच्या हत्येची बिश्नोई गँगने योजना आखली होती, पंजाबच्या डीजीपींनी केला हा मोठा खुलासा)

 

'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड (World Wide) एकूण 75 कोटींचा (Crores) व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशीही त्याची कमाई वाढली आणि सर्व देशांसह 85 कोटींचा आकडा गाठला आहे. आता अवघ्या दोन दिवसांत 'ब्रह्मास्त्र'चं वर्ल्डवाइड कलेक्शन 160 कोटींच्या घरात आहे. वर्ल्डवाइड ब्रम्हास्त्रने एक नवा विक्रम आपल्या नावी नोंदवला आहे. तरी पुढील आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात ब्रम्हास्त्र किती कमाई करतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. दिग्दर्शक आयान मुखर्जीसह अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टला या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now