IPL Auction 2025 Live

Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन खऱ्या आयुष्यातही आहेत लढवय्ये; 'या' गंभीर आजारांवर मात करूनही उमठवला फिल्म इंडस्ट्रीमध्ये ठसा

पण हा अभिनेता खऱ्या आयुष्यातही फायटर आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक गंभीर आजारांना तोंड दिले आहे पण हे सर्व असूनही त्यांनी नेहमीच त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे.

Amitabh Bachchan (Photo Credits: Facebook)

Amitabh Bachchan Birthday: मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. आजही बिग बी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सतत सक्रिय असतात. ते केवळ चित्रपटांमध्येच काम करत नाही तर छोट्या पडद्यावरील केबीसी शोचे सूत्रसंचालनही करताना दिसतात. या वयातही अमिताभ अनेक तास काम करतात. बॉलीवूडमध्ये शहेनशाह आणि अँग्री यंग मॅनच्या प्रतिमेने प्रसिद्ध असलेल्या बिग बींना तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये खलनायकच्या भूमिकेत पाहिले असेल. पण हा अभिनेता खऱ्या आयुष्यातही फायटर आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक गंभीर आजारांना तोंड दिले आहे पण हे सर्व असूनही त्यांनी नेहमीच त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे.

यकृताच्या गंभीर आजाराचा केला सामना -

अमिताभ बच्चन यांनी आयुष्यात अनेकदा गंभीर आजारांशी झुंज दिली आहे. अमिताभ बच्चन यांना अनेक दिवसांपासून यकृताशी संबंधित समस्येचा सामना करावा लागत आहे, हे बहुतेकांना माहीत असेल. वास्तविक अमिताभ बच्चन यांना कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पोटात दुखापत झाली होती, त्यानंतर त्यांना बराच काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात त्यांचे 75 टक्के यकृत देखील खराब झाले आहे. आजपर्यंत अनेकवेळा यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागले आहे. 2006 मध्ये अमिताभ यांनाही हेपेटायटीस बी झाल्याचे निदान झाले होते. प्रदीर्घ उपचारानंतर त्यांचा आजार बरा झाला. पण तरीही ते जेवणापेक्षा जास्त औषधे खातात असे म्हणतात. (हेही वाचा - Phone Bhoot Trailer Out: 'फोन भूत'चा ट्रेलर रिलीज; कतरिना-सिद्धांत आणि ईशानची कॉमेडी पाहून व्हाल लोटपोट, Watch Video)

अमिताभ बच्चन यांनी Myasthenia Gravis शीदेखील दिली आहे झुंज -

अमिताभ बच्चनची चपळता तरुण कलाकारांनाही आश्चर्यचकित करते. परंतु, बिग बींना मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या आजाराने देखील घेरले होते. हे फार कमी लोकांना माहीत असेल. हा एक रोग आहे जो स्वयंप्रतिकार प्रणालीवर परिणाम करतो, ज्यामध्ये नसा आणि स्नायू यांच्यात अडथळा निर्माण होतो.

बिग बींनी केला टीबीचा सामना -

अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही एकेकाळी टीबीचा सामना करावा लागल्याचे नमूद केले आहे. 2000 मध्ये त्यांना याची माहिती मिळाली आणि त्यानंतर लगेचच त्यांनी यावर उपचार सुरू केले.