कोविड-19 संकटात अभिनेत्री Sushmita Sen ची मोठी मदत; रुग्णालयाला केला ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा
कोरोना व्हायरस संकट आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा यामुळे देशात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने मोठी मदत केली आहे.
कोरोना व्हायरस संकट आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा यामुळे देशात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिने मोठी मदत केली आहे. दिल्ली (Delhi) मधील एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचे समजताच तिने त्या रुग्णालयासाठी ऑक्सिजन सिलेंडर्सची (Oxygen Cylinders) सोय केली. मात्र ते मुंबईहून दिल्लीला पाठवण्यासाठी तिच्याकडे कोणताही मार्ग नसल्याने तिने चाहत्यांना मदतीचे आवाहन केले आहे. याबद्दल ती सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे.
सुश्मिता आपल्या ट्विटमध्ये लिहिते, "सगळीकडे भेडसावत असलेल्या ऑक्सिजन समस्येबद्दल ऐकून फार वाईट वाटतं. मी या हॉस्पिटलसाठी काही ऑक्सिजन सिलेंडरची सोय केली आहे. पण मुंबई हून दिल्लीला पाठवण्यासाठी माझ्याकडे मार्ग नाही. यासाठी कृपया मला मदत करा." यावर चाहत्यांकडून सुष्मिताला विविध पर्याय सुचवण्यात आले. तसंच तिचे भरभरुन कौतुकही केले.
दरम्यान, दुसरे ट्विट करत सुश्मिताने लिहिले की, "मी सांगत असलेल्या हॉस्पिटलमध्ये सध्यातरी ऑक्सिजनचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे सिलेंडर पोहचवण्यासाठी आपल्याला अधिक वेळ मिळाला आहे. मात्र तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद." (अभिनेत्री सुश्मिता सेन हिने COVID-19 विरोधात लढण्यासाठी सांगितले 100% गुणकारी ठरणारे औषध)
Sushmita Sen Tweet:
Shanti Mukand Hospital या दिल्लीतील हॉस्पिटलला सुष्मिताने मदत केली असून काल एएनआयने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओत हॉस्पिटलचे सीईओ सुनील सागर हे अगदी भावूकपणे हॉस्पिटलची स्थिती मांडत होते. या व्हिडिओची लिंक तिने आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुश्मिताने या हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.