Lockdown: बॉलिवुड अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केला मुलीसोबतचा डान्स व्हिडीओ; Watch Video
लॉकडाऊन काळात अनेक कलाकार आपल्या चाहत्यांचं सोशल मीडियावर आपले व्हिडिओ शेअर करून मनोरंजन करत आहेत. तसेच अलीकडे कलाकार मंडळीदेखील टिकटॉक अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. बॉलिवुड अभिनेत्री रवीना टंडनने आपल्या मुलीसोबतचा एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रवीना आपल्या लेकीसोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे. रवीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊन (Lockdown) काळात अनेक कलाकार आपल्या चाहत्यांचं सोशल मीडियावर आपले व्हिडिओ शेअर करून मनोरंजन करत आहेत. तसेच अलीकडे कलाकार मंडळीदेखील टिकटॉक अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. बॉलिवुड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) आपल्या मुलीसोबतचा एक टिकटॉक व्हिडिओ (Tiktok Video) शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रवीना आपल्या लेकीसोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे. रवीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. रवीनाने शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांना पाहिला असून लाईक तसेच कमेंन्टसही दिल्या आहेत. टिकटॉकवर दररोज अनेक नवनवीन ट्रेण्ड येत असतात. यातील एक ट्रेण्ड रवीना फॉलो करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रवीना तिच्या मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या माय-लेकींचा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. (हेही वाचा - 'RIP My Bruno': ब्रुनो कुत्र्याचे निधन; अनुष्का शर्मा, विराट कोहली यांना दु:ख, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना)
दारूच्या दुकानाबाहेरील गर्दीवर Randeep Hooda ने शेअर केला EXTRACTION लुक फोटो; मीम होतय वायरल - Watch Video
रवीना टंडन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. गेल्या अनेक वर्षांपासून रवीना मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असले तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. रवीनाच्या वर्क आऊटबद्दल बोलायचं म्हटलं तर ती लवकरच ‘केजीएफ पार्ट 2’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.