बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा हिने 15 फूटांवरुन मारली उडी, पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) ही सध्या सुट्टीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) फिरण्यासाठी गेली आहे.

Nushrat Bharucha (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) ही सध्या सुट्टीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) फिरण्यासाठी गेली आहे. तेथील एक व्हिडिओ नुसरत हिने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यामध्ये ती 15 फूटांवरुन खाली उडी मारताना दिसून येत आहे.

नुसरत ही ऑस्ट्रेलिया येथे परिवारासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. त्यावेळी नुसरत हिने प्रथमच स्काय डायव्हिंग (Sky Diving) केले असून त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. नुसरत स्काय डायव्हिंग करताना खुप घाबरलेली दिसून येत असून तिच्यासोबत असणाऱ्या निर्देशकाने तिला धीर देत डायव्हिंगसाठी प्रोत्साहन केले आहे. तसेच व्हिडिओ पोस्ट करत तिने असे सुद्धा म्हटले आहे की, मला उडण्याची इच्छा होती ती स्काय डायव्हिंगमुळे पूर्ण झाली आहे.(हेही वाचा-सोफिया हयात हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला न्यूड फोटो, नेटकऱ्याकडून संताप व्यक्त)

 

View this post on Instagram

 

Have always wanted to fly and I finally got to it!! #Australia #Skydiving 🤩🤩🤩⛅️⛅️

A post shared by nushrat (@nushratbharucha) on

तर लवकरच नुसरत तिचा आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल' मधून झळकणार आहे. यामध्ये आयुष्यमान खुरानासुद्धा तिच्यासोबत अभिनय करताना दिसून येणार असून एका प्रेमकथेवर आधारित आहे.