Maja Ma Trailer Out: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या 'मजा मा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ

Maja Ma Trailer Out (PC - You Tube)

Maja Ma Trailer Out: प्राइम व्हिडिओने आज आपल्या बहुप्रतिक्षित, इंडियन अमेझॉन ओरिजिनल मुव्ही 'मजा मा' (Maja Ma) चा ट्रेलर लाँच केला. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ची महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय या चित्रपटा कौटुंबिक मनोरंजनासाठी इंडस्ट्रीतील दिग्गजांसह नवीन चेहऱ्यांनी सजलेली एक उत्कृष्ट स्टारकास्ट आहे. या चित्रपटात गजराज राव, रित्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, सिमोन सिंग, शीबा चड्ढा, मल्हार ठकार आणि निनाद कामत या कलाकारांचा समावेश आहे.

या चित्रपटात कॉमेडी आहे, खूप प्रेमही आहे, पण काहीतरी आहे ज्यामुळे नात्यात दुरावा येतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे, तर सुमित बठेजा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. लिओ मीडिया कलेक्टिव्ह आणि अमृतपाल सिंग बिंद्रा निर्मित, हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर भारत आणि 240 देशांमध्ये प्रसारित होईल. (हेही वाचा - Fraud Case: लोकप्रिय टीव्ही-चित्रपट अभिनेता Mahesh Thakur ची पाच कोटींची फसवणूक; पोलिसात तक्रार दाखल)

कथेबद्दल बोलायचे झाले तर, एक आनंदी-नशीबवान महिला, पल्लवी (माधुरी दीक्षित) च्या जीवनाची झलक पाहायला मिळते. जी तिच्या मध्यमवर्गीय कुटुंबाची आणि ती ज्या समाजात राहते त्या समाजाची ताकद आहे. चित्रपटाची कथा पल्लवीभोवती फिरते. जसजशी कथा पुढे सरकत जाते, तसतसे तिने जिवापाड जपलेल्या नात्यांमध्ये अडचणी निर्णाण व्हायला सुरूवात होते. तिच्या मुलाची engagement ला धोका निर्माण होतो. हा संघर्ष परस्पर समंजसपणा आणि विश्वासासाठी विद्यमान नातेसंबंधांची चाचणी घेतो. या चाचणीचे कारण काय आहे? पल्लवी आणि तिचे कुटुंबीय या गोंधळाला कसे सामोरे जातील? यामुळे कुटुंबातील सदस्य जवळ येतील की, नवीन नातेसंबंध तूटतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 6 ऑक्टोबरला मिळणार आहेत.