बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना म्हणतो माझ्या यशात 'या' अभिनेत्रीचा सिंहाचा वाटा
माझ्या यशात भूमी पेडणेकरचा सिंहाचा वाटा असून ती माझ्यासाठी लकी असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना (Bollywood actress Ayushman Khurana ) याने अगदी कमी दिवसात बॉलिवूडमध्ये यश मिळवलं. त्याच्या अनेक चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. सध्या ‘बाला’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 76 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमानने आपल्या यशाचे खरे गुपीत सांगितले आहे.
माझ्या यशात अभिनेत्री भूमी पेडणेकरचा (Bhumi Pednekar) सिंहाचा वाटा असून ती माझ्यासाठी लकी असल्याचंही त्याने म्हटलं आहे. (हेही वाचा - अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'गुलाबो सिताबो' या चित्रपटातील हा लूक बघून तुम्हीही व्हाल अचंबित)
आयुषमान आणि भूमी पेडणेकरने आतापर्यंत ‘दम लगा के हइशा’, ‘शुभ मंगल सावधान’ आणि आता ‘बाला’ या तीन चित्रपटात एकत्र काम केले आहे. हे तीनही चित्रपट आयुषमानचे सर्वात चांगले चित्रपट म्हणून ओळखले जातात. आयुषमान खुरानाचा कायम आपल्या हटके भूमिकांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. 'बाला' सिनेमासाठी आयुषमानने नेहमीप्रमाणेच खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटातील त्याचा लुक पाहून प्रेक्षकांनी आयुषमानचं कौतुक केलं आहे.