बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने खारमध्ये घेतले 8 बेडरुमचे आलिशान घर

टायगर एप्रिल महिन्यात आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत या घरात राहायला जाणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, टायगरच्या नव्या घराचे इंटिरिअर जॉन अब्राहमचा भाऊ अलान करणार आहे.

Bollywood actor Tiger Shroff (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने (Bollywood Actor Tiger Shroff)  खारमध्ये (Khar) 8 बेडरुमचे आलिशान घर घेतलं आहे. टायगर एप्रिल महिन्यात आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत या घरात राहायला जाणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, टायगरच्या नव्या घराचे इंटिरिअर जॉन अब्राहमचा भाऊ अलान करणार आहे. टायगरची आई आयेशा श्रॉफ हे घर सजवण्यासाठी त्याला मदत करत असल्याचंही स्पॉटबॉयने सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून टायगर नव्या घराच्या शोधात होता. परंतु, त्याला आपल्या मनाप्रमाणे घर सापडत नव्हतं. (हेही वाचा - 'मर्दानी 2' चित्रपटाच्या शूटींगसाठी 41 व्या वर्षी राणी मुखर्जीने घेतले स्विमिंगचे प्रशिक्षण!)

दरम्यान, टायगर श्रॉफला जॉन अब्राहमचे घर आवडले होते. जॉनच्या घराची सजावट अलानने केली होती. त्यामुळे टायगरने आपल्या नव्या घराच्या इंटिरिअरची जबाबदारी अलानवर सोपवली आहे. टायगरने आपल्या घरातील एक कोपरा जिमसाठी राखून ठेवला आहे. टायगरचे आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष असते. त्यामुळे त्याने आपल्या नव्या घरात जिमसाठी जागा ठेवली आहे.

 

View this post on Instagram

 

About last night... #diwali2019

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगरच्या 'वॉर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला. या चित्रपटात टायगर आणि ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत होते. आता टायगर 'बागी 3' चित्रपटात दिसणार आहे. 'बागी 3' चित्रपटात टायगरची मुख्य भूमिका असणार आहे.

 

View this post on Instagram

 

Sun is shinin...but weather ain't easyyy....11 degrees🥶 Pic Courtesy - @ruchitrajguru . . #baaghi3

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

बागी चित्रपटाच्या पहिल्या भागात टायगरसोबत श्रद्धा कपूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. तसेच दुसऱ्या भागात दिशा पटानीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. परंतु, आता बागी 3 चित्रपटात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.