बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ने सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला केली 45 लाख रुपयांची मदत
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध राज्यात अडकले आहेत. या मजूंराना कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या मजूरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सानू सूदने (Sonu Sood) भरभरून मदत केली आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी अनेक कलाकारांनी आर्थिक मदत केली.
देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध राज्यात अडकले आहेत. या मजूंराना कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या मजूरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सानू सूदने (Sonu Sood) भरभरून मदत केली आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी अनेक कलाकारांनी आर्थिक मदत केली.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ने यापूर्वी पंतप्रधान केअर फंडला 25 कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यानंतर आता अक्षयने पुन्हा सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनलाही 45 लाख रूपयांची मदत दिली आहे. तसेच काही पीपीई किट्स आणि मास्कचे वाटपदेखील केले आहे. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नंतर बिग बी देखील करणार उत्तर प्रदेशच्या मजूरांना मदत)
दरम्यान, सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे सीनिअर ज्वॉइंट सेक्रेटरी व अभिनेते अमित बहल यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे अनेक ज्युनिअर आर्टिस्ट आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही यासंदर्भात अक्षय कुमारसोबत चर्चा केली. यावर अक्षयने आमच्याकडून ज्युनिअर आर्टिस्टची यादी मागितली. आम्ही त्याला 1500 लोकांची यादी दिली. अक्षयने या सर्वांच्या खात्यावर प्रत्येकी 3 हजार रूपये जमा केले. विशेष म्हणजे अक्षयने यापुढेही मदत भासल्यास सांगा, असंही आवाहन केलं.
View this post on Instagram
Sometimes it’s best to sit it out 😷 #ThisTooShallPass
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on
Lockdown : श्री - जान्हवी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; 'होणार सुन मी या घरची' मालिकेचे प्रक्षेपण - Watch Video
अभयने यापूर्वी देखील पीएम केअर फंडात 25 कोटी रुपयांचा निधी दिला होता. तसेच पीपीई आणि रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेला 3 कोटी रुपयांचा निधी दिला होता. याशिवाय अक्षयने मुंबई पोलिसांनादेखील 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. अक्षयच्या या सामाजिक सहकार्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं.