अभिनेता सुनील शेट्टी याची इमारत सील, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेचा निर्णय
या इमारतीमध्ये बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Snil Shetty) याचे घर आहे.
मुंबईतील अल्टामाउंट रोडवर असलेल्या पृथ्वी अपार्टमेंट ही इमारत सील करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Snil Shetty) याचे घर आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ही इमारत महापालिकेकडून सील करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नियमानुसार कोणत्याही इमारतीत पाच पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करणे गरजेचे आहे. दरम्यान, सुनील शेट्टी आणि त्याचा परिवार सध्या मुंबई बाहेर आहे.
सील करण्यात आलेली इमारत 30 मजली असून यामध्ये 120 फ्लॅट्स आहेत. मुंबईतील के जी वॉर्डचे असिस्टंट कमिश्नर प्रशांक गायकवाड यांनी या घटनेची पुष्टी करत इमारत सील केल्याचे म्हटले आहे. मुंबईतील के डी वॉर्डामध्ये सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या 10 ठिकाणांना सील करण्यात आले आहे.यामध्ये मालाबार हिल्स आणि पेडर रोड यांचा सुद्धा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उच्चभ्रु ठिकाणांहून 80 टक्के प्रकरणे समोर आली आहेत.(Naseeruddin Shah यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पाहा Latest Photo)
Tweet:
सुनील शेट्टी आणि त्याच्या परिवारा बद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्याचे अधिकृत प्रवक्ते यांनी पुष्टी केली आहे की, सध्या ते लोक मुंबई बाहेर आहेत. सुनील आणि त्याचा परिवार गेल्या काही काळापासून पृथ्वी अपार्टमेंट्स मध्ये राहतो. या व्यतिरिक्त आणखी 25 परिवार यामध्ये राहतात. या इमारतील कोरोनाचे काही रुग्ण आढळले होते त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.