Kangana Ranaut-BMC Controversy: कंगना रनौत च्या पाली कार्यालयावर BMC ने बुलडोजर न चढवता केवळ नोटिस देऊन गेल्याने अभिनेत्रीने मानले जनतेचे आभार

यामुळे कंगनाचा जीव भांड्यात पडला असून सर्वांनी दिलेली साथ आणि समर्थनामुळे हे शक्य झाले असे सांगून कंगनाने सर्वांचे आभार मानले आहे.

Kangana Ranaut Pali Hill Office (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड क्वीन फेम कंगना रनौत हिच्या मुंबईच्या पाली हिल येथील कार्यालयावर आज बुलडोजर चालवणार असल्याचा दावा कंगनाने काल ट्विटच्या माध्यमातून केला होता. मात्र तिच्या कालच्या ट्विटनंतर आणि BMC ने तिच्या कार्यालयाची अचानक पाहणी केल्यानंतर सोशल मिडियावर कंगनाच्या चाहत्यांनी हा मुद्दा उचलून धरला. आपले स्वप्न लवकरच तुटणार असल्याचे भावनिक ट्विट कंगनाने केल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या विरोधामुळे की काय पण आज मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयावर बुलडोजर न चालवता केवळ तेथील काम थांबविण्याचे नोटिस देऊन गेले. यामुळे कंगनाचा जीव भांड्यात पडला असून सर्वांनी दिलेली साथ आणि समर्थनामुळे हे शक्य झाले असे सांगून कंगनाने सर्वांचे आभार मानले आहे.

दरम्यान BMC अधिका-यांनी काल अचानक कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयाची अचानक पाहणी केली होती. तिने हे बांधकाम करताना BMC च्या नियमांचे उल्लंघन तर केलं नाही ना हे पाहण्यासाठी ते तेथे गेले होते. त्यावर कंगनाने नाराजी व्यक्त करत माझे कार्यालय हे अनधिकृत नसून सर्व सरकारी कागदपत्रे माझ्याकडे आहे असे ट्विटच्या माध्यमातून सांगितले होते. तसेच BMC 8 सप्टेंबरला माझे कार्यालय तोडणार आहे असा दावा तिने केला होता. मात्र तसं काही झालं नाही. यामुळे कंगनाने ट्विट करत सर्वांचे आभार मानले आहे. Kangana Ranaut हिला मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाचे काम थांबविण्याची BMC कडून नोटिस

कंगनाने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "सोशल मिडियावर माझ्या सर्व चाहत्यांनी BMC वर टिका केली. त्यामुळे ते आज बुलडोजर घेऊन आले नाही. केवळ कार्यालयातील सुरु असलेले गळतीचे काम थांबविण्याची नोटिस चिकटवली आहे. मित्रांनो मला खूप इजा होऊ शकते. मात्र मला खूप चांगले वाटले की, तुमच्याकडून मला भरपूर प्रेम आणि समर्थन मिळत आहे."

दरम्यान कंगना उद्या मुंबईत येणार असून तिच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'Y' दर्जाची सुरक्षा दिली आहे. तर दुसरीकडे कंगनाने माफी मागावी तर मी विचार करेन असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. तर 'मी 9 सप्टेंबरला मुंबईत येणार असून कुणाला काय करायच आहे ते करा' असे आव्हान कंगनाने केले आहे. त्यामुळे थोडक्यात हे प्रकरण आता आणखी काय वळणं घेत हे कंगना उद्या मुंबईत आल्यावरच कळेल.