आपल्या एकाहून एक सरस भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडनेकर (Bhumi Pednekar) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. चित्रपटांप्रमाणे सोशल मिडियावरही बरीच सक्रिय असलेली भूमि आपल्या हॉट आणि सेक्सी अदांनी आपल्या चाहत्यांनी घायाळ करत असते. तिचे सेक्सी फोटोज नेहमी सोशल मिडियावर चर्चेत असतात. नुकताच तिने आपला बाथ टबमधील हॉट फोटो तिच्या इन्स्टाअकाऊंटवर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये तिने पांढ-या रंगाचे Bath Robes घातले आहे. यात ती खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे.
पाहा फोटो:
हेदेखील वाचा- भूमी पेडणेकर ठरली 'Face Of Asia'; बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मिळाला सन्मान
लवकरच 'दुर्गावती' या चित्रपटात भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) मुख्य भूमिका साकारणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) प्रेझेंटर म्हणून 'दुर्गावती' (Durgavati Movie) या चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षयने आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत घोषणा केली होती. अक्षयने आपल्या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला आहे. यात चित्रपटाशी निगडीत 5 भूमिका दिसत आहेत. यात प्रत्येकाने आपल्या हातात एक पाटी धरलेली आहे.
भूमीनेदेखील आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत घोषणा केली आहे. भूमीने या चित्रपटासाठी उत्साही असल्याचं म्हटलं आहे. भूमीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात 'हिरो' ची पाटी आहे. म्हणजेच या चित्रपटात दुर्गावतीची भूमिका भूमी साकारणार आहे, हे स्पष्ट होत आहे.