Bharti Singh Gifts Neetu Kapoor: भारती सिंगने नीतू कपूरला गिफ्ट केला प्रेशर कुकर; पहा मजेशीर व्हिडिओ
भारतीने रणबीर आणि आलियाला त्यांच्या लग्नात प्रेशर कुकर भेट म्हणून दिला आहे. हे गिफ्ट पाहून नीतू कपूर खूप खुश झाली. यावेळी नितू कपूर म्हणाली, आता मी हे गिफ्ट माझी सून आलियाला देणार आहे.
Bharti Singh Gifts Neetu Kapoor: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा विवाह 14 एप्रिल 2022 रोजी मुंबईत पार पडला. यानंतर रणबीर-आलियाने शनिवारी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्टी आयोजित केली होती. नीतू कपूर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, आदित्य सील, अनुष्का रंजन, शाहरुख खान, गौरी खान, तारा सुतारिया, आधार जैन, शाहीन भट्ट, सोनी राजदान, लव रंजन, रोहित धवन, अयान मुखर्जी, करण असे अनेक सेलिब्रिटी या भव्यदिव्य कार्यक्रमात उपस्थित होते.
नीतू कपूर (Neetu Kapoor) ने लग्नानंतर लगेचचं कामाला सुरुवात केली आहे. 'हुनरबाज'च्या ग्रँड फिनालेमध्ये त्या स्पेशल गेस्ट म्हणून दिसणार आहे. यादरम्यान कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) ही फिनालेचा भाग होती. मुलाला जन्म दिल्यानंतर 12 दिवसांनी भारती कामावर परतली आहे. 'हुनरबाज'च्या सेटवर लग्नासारखे वातावरण तयार करण्यात आले. कारण, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा नुकताचं लग्नसोहळा पार पडला. यानंतर भारतीने गमतीने आलियाला प्रेशर कुकर भेट म्हणून दिला. कॉमेडियन भारती यावेळी म्हणाली, तिने करण जोहरकडे रणबीर आणि आलियाला गिफ्ट दिले होते. परंतु, करण जोहर कदाचित ते गिफ्ट देण्याचं विसरला. (हेही वाचा - Ranbir Alia Mehendi: रणबीर-आलियाच्या मेहंदीचे फोटो व्हायरल)
भारतीने रणबीर आणि आलियाला त्यांच्या लग्नात प्रेशर कुकर भेट म्हणून दिला आहे. हे गिफ्ट पाहून नीतू कपूर खूप खुश झाली. यावेळी नितू कपूर म्हणाली, आता मी हे गिफ्ट माझी सून आलियाला देणार आहे. भारतीने असा युक्तिवाद केला की, तिने लग्नाचे फोटो पाहिले. यात रणबीर खूप हडकूळा दिसत होता. त्यामुळे तिने प्रेशर कुकर सारख्या उपयुक्त भेटवस्तूची योजना आखली. जेणेकरून आलिया त्यात रणबीरसाठी स्वादिष्ट अन्न शिजवू शकेल.
पहा मजेदार व्हिडिओ -
Neetu ji ko mila Haarsh aur Bharti se ek anokha gift. Comments mein bataiye humein, aap kya dena chaahenge #RanLia ko as wedding gift?
Dekhiyega zaroor, #Hunarbaaz Desh Ki Shaan #GrandFinale, aaj raat 9 baje sirf #Colors par. Anytime on @justvoot pic.twitter.com/DKMZXqaCAR
— ColorsTV (@ColorsTV) April 16, 2022
हुनरबाज ग्रँड फिनालेमध्ये डान्स दिवाने ज्युनियर्सला प्रोत्साहन देण्यासाठी नोरा फतेही, मर्जी पेस्टनजी, नीतू कपूर सहभागी झाले. दरम्यान, वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सिद्धार्थ मल्होत्राने आलियाला तिच्या लग्नात व्हर्साची हँडबॅग भेट दिली होती. दीपिका पदुकोणने नवविवाहित जोडप्याला चोपर्ड येथील घड्याळे भेट दिली. कतरिना कैफने आलियाला प्लॅटिनम ब्रेसलेट गिफ्ट केल्याचे बोलले जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2022 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

