Bell Bottom Teaser: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार च्या 'बेल बॉटम' चित्रपटाचा टीझर लाँच; पहा अभिनेत्याचा 80 च्या दशकातील खास लूक

अक्षय कुमारदेखील आपल्या चाहत्यांसाठी या चित्रपटासंदर्भातील सर्व अपडेट्स शेअर करत असतो. अक्षयने आज या चित्रपटाचा पहिला टीझर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'बेल बॉटम' मधील अक्षय कुमार चा लुक (Photo Credits: Youtube)

Bell Bottom Teaser: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'बेल बॉटम' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अक्षय कुमारदेखील आपल्या चाहत्यांसाठी या चित्रपटासंदर्भातील सर्व अपडेट्स शेअर करत असतो. अक्षयने आज या चित्रपटाचा पहिला टीझर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रेक्षकांकडून या टीझरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या टीझरमध्ये अक्षयचा चित्रपटातील लूक, शैली आणि व्यक्तिरेखेची झलक दाखवण्यात आली आहे. अक्षयने आपल्या ट्विटर हँडलवर या चित्रपटाचा टीझर शेअर करताना म्हटलं आहे की, 'बेल बॉटम. 80 च्या दशकातील रोमांचक आठवणी सादर करत आहे. बेल बॉटम चित्रपटाचा टीझर लाँच करत आहे.'

या चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षयने काळ्या रंगाचा चष्मा घातलेला असून कोट परिधान केलेला दिसत आहे. या चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. रणजित तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट 2 एप्रिल 2021 रोजी रिलीज होणार आहे. (हेही वाचा - Bigg Boss 14 च्या घरात मराठमोळा राहुल वैद्य; जाणून घ्या इंडियन ऑयडल फेम गायकाबद्दल काही इंटरेस्टींग गोष्टी!)

या चित्रपटाशिवाय अक्षय कुमार 'सूर्यवंशी' आणि 'लक्ष्मी बॉम्ब' मध्येदेखील मुख्य भूमिका साकारणार आहे. सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, लक्ष्मी बॉम्ब चित्रपट येत्या 9 नोव्हेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपी वर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसात अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’, ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’, ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे एकूण 7 चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षयने कोरोना काळात बेल बॉटम चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केलं. त्यानंतर आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.