Celebrities Who Played Ravana on Screen: सैफ अली खानच्या आधी 'या' स्टार्संनी साकारली आहे रावणाची भूमिका

आम्ही या लेखात तुम्हाला अशा सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी सैफ अली खानपूर्वी रावणाची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेली रावणाची भूमिका आजही लोक विसरू शकलेले नाहीत.

सैफ अली खान, अरविंद त्रिवेदी (PC - Twitter)

Celebrities Who Played Ravana on Screen: वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या (Dussehra) सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कोविड काळानंतर पहिल्यांदाच हा सण कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरा केला जात आहे. एकीकडे दसऱ्याची उत्साह असताना दुसरीकडे आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटात रावणाची (Ravana)  भूमिका साकारणारा सैफ अली खान (Saif Ali Khan) ही चांगलाच चर्चेत आहे. सैफ अली खानसोबतच आदिपुरुष हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. आम्ही या लेखात तुम्हाला अशा सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी सैफ अली खानपूर्वी रावणाची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेली रावणाची भूमिका आजही लोक विसरू शकलेले नाहीत.

अरविंद त्रिवेदी -

या यादीत अरविंद त्रिवेदी यांचे नाव प्रथम येते. आजवर रावणाची भूमिका साकारलेल्या स्टार्सपैकी एकही स्टार अरविंदइतका सरस ठरला नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. रामानंद सागर यांच्या रामायणात अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकारली होती. लोकांनी अरुण गोविल आणि दीपिका चिखलियाला राम आणि सीतेच्या रूपात भरभरून प्रेम दिले होते. तर दुसरीकडे लोक अरविंदला खऱ्या आयुष्यात रावणाच्या रूपात द्वेष करू लागले होते. अरविंदने एका मुलाखतीत असे काही किस्से सांगितले होते. (हेही वाचा - Adipurush Teaser Controversy: आदिपुरुष चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; अपमानकारक दृश्ये न हटवल्यास BJP नेत्याचा कारवाईचा इशारा)

सचिन त्यागी -

टीव्ही अभिनेता सचिन त्यागीनेही रावणाची भूमिका साकारली आहे. 'रामायण- जीवन का आधार' या टीव्ही शोमध्ये सचिनने रावणाची भूमिका साकारली होती. मुख्यतः सकारात्मक भूमिका साकारणारा सचिन रावणाच्या भूमिकेसाठी चर्चेत होता आणि त्याने बरीच प्रशंसा मिळवली होती.

पारस छाबरा -

पारस छाब्राला रावणाची भूमिका करताना पाहून काय वाटेल याची कोणीही कल्पना केली नसेल, पण तरीही पारसने हे पात्र उत्तमरित्या साकारले. पारसने टीव्ही शो विघ्नहर्ता गणेशमध्ये रावणाची भूमिका साकारली होती. एकीकडे पारसला या पात्रात पसंती मिळाली होती, तर दुसरीकडे काही लोकांनी त्याला सांगितले की, तो या पात्राला न्याय देऊ शकत नाही. पारस छाबरा अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसला आहे.

आर्य बब्बर -

अभिनेता आर्य बब्बर त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो आणि त्याने रावणाच्या पात्रातही अशीच कामगिरी दाखवली होती. आर्य बब्बरने संकटमोचन महाबली हनुमान या टीव्ही शोमध्ये रावणाची भूमिका साकारली होती. आर्य बब्बरच्या रावण पात्राची फारशी चर्चा झाली नाही. पण प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली.

प्रेम नाथ -

प्रेम नाथ बद्दल फारसे माहिती नाही, परंतु मोठ्या पडद्यावर रावणाचे पात्र जिवंत करणारे ते सर्वात सुरुवातीच्या स्टार्सपैकी एक आहेत. 1976 मध्ये आलेल्या बजरंग बली या चित्रपटात प्रेमनाथ यांनी रावणाची भूमिका साकारली होती. प्रेमनाथ यांनी ही व्यक्तिरेखा अतिशय उत्तम प्रकारे साकारून प्रेक्षकांची मने जिंकली.

तरुण खन्ना -

या यादीत सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेता तरुण खन्ना यांचे नाव देखील समाविष्ट आहे. तरुण खन्नाने 'देवो के देव महादेव' या टीव्ही शोमध्ये रावणाची भूमिका साकारली होती. तरुणाने ही व्यक्तिरेखा चोख बजावून प्रेक्षकांची मने जिंकली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now