Bayo Song: ‘कोक स्टुडिओ’च्या मराठी गाण्याला मिळाले मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज; सायली खरे आणि सृष्टी तावडेच्या आवाजातील गाण्याने घातला धुमाकूळ
ज्या प्रकारे या गाण्याची रचना केली आहे, गाणे सादर करताना कल्पकता दाखवली आहे. तसेच महिलांचा महाराष्ट्रीयन लूक यांमुळे नेटकऱ्यांनी बायोचे कौतुक केले आहे.
केले आहे. सृष्टी तावडे आणि सायली खरे यांच्या आवाजातील या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. गाण्याचे बोल, महाराष्ट्राची संस्कृती, ढोल-ताशा, डोक्याला फेटा, पाठीमागे दिसणारी वारली चित्रकला यांमुळे या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (हेही वाचा - Bigg Boss Marathi 5: 'जाऊ द्याना घरी' या मराठी गाण्यांवर बिग बॉसच्या घरात जान्हवीसोबत वर्षाताई थिरकल्या, पाहा व्हिडिओ)
“महाराष्ट्रातील स्त्रियांमार्फत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सौंदर्य आणि सामर्थ्य साजरे करीत आहोत. महाराष्ट्राची संस्कृती आपल्या सुंदर आणि सक्षम महिलांच्या खांद्यावर अभिमानाने विसावली आहे. ती निसर्गाची शक्ती आहे, मातीचा कण आहे व मायावी स्वप्न आहे. ‘बायो’ अशा सर्व स्त्रियांसाठी ज्या स्वत:साठी एकत्र येतात, त्यांच्या आत्मविश्वासासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी आणि तुमच्या आवाजासाठी आहे. सर्व महिलांची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. बायो तुमच्यामधील शक्तीची आठवण करून देण्यासाठी आहे”, असे या गाण्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे.
पाहा व्हिडिओ -
बायो हे गाणे यूट्यूबवर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या गाण्याचे कौतुक केले आहे. ज्या प्रकारे या गाण्याची रचना केली आहे, गाणे सादर करताना कल्पकता दाखवली आहे. तसेच महिलांचा महाराष्ट्रीयन लूक यांमुळे नेटकऱ्यांनी बायोचे कौतुक केले आहे. दरम्यान, बायो या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून, याला एक मिलियन पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.