Makeup Artist Attacked By Leopard: मुंबईतील फिल्म सिटीमध्ये 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा हल्ला

श्रवण विश्वकर्मा (Shravan Vishwakarma) असं या मेकअप आर्टिस्टचं नाव आहे.

Leopard प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Wikimedia commons)

Makeup Artist Attacked By Leopard: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ स्टारर बडे मियाँ छोटे मियाँ (Bade Miyan Chote Miyan) च्या सेटवर काम करणाऱ्या एका मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) वर बिबट्याने (Leopard) हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तो त्याच्या मित्राला शूटवरून सोडण्यासाठी गेला होता आणि परतत असताना त्याच्यावर हल्ला झाला.

बडे मियाँ छोटे मियाँच्या सेटवर काम करणाऱ्या मेकअपमनवर बिबट्याने हल्ला केला. श्रवण विश्वकर्मा (Shravan Vishwakarma) असं या मेकअप आर्टिस्टचं नाव आहे. दुचाकीवरून जात असताना बिबट्याची धडक बसली. (हेही वाचा - शहजादा स्टार Kartik Aaryan ने आपल्या लॅम्बोर्गिनी गाडीसाठी भरले चालान; Mumbai Traffic Police म्हणतात- 'कोणीही नियमांची पायमल्ली करू शकत नाही')

यासंदर्भात बोलताना विश्वकर्माने सांगितलं की, मी माझ्या मित्राला बाईकवरून सोडायला आलो होतो. शूट लोकेशनपासून थोडं पुढे गेल्यावर आम्हाला एक डुक्कर रस्ता ओलांडताना दिसला. मी दुचाकीचा वेग वाढवताच एक बिबट्या डुकराच्या मागे धावत असल्याचे आम्हाला दिसले. माझी दुचाकी बिबट्याला धडकली. त्यानंतर मला एवढेच आठवते की मी बाईकवरून पडलो आणि बिबट्या माझ्याभोवती फिरत होता. त्यानंतर काय झालं ते मला काहीच आठवत नाही. मला चक्कर आली. नंतर कदाचित कोणीतरी मला डॉक्टरांकडे घेऊन गेलं.

ऑल इंडिया सिने वर्कर्सचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या घटनेनंतर तातडीने सरकारने या संपूर्ण प्रकरणात गांभीर्याने पावले उचलण्याची विनंती केली. त्यांनी सांगितले की, त्यांना श्रावणच्या सिनियर मेकअप आर्टिस्ट ममता यांचा फोन आला होता. त्यांनी श्रावणसोबत घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. फिल्मसिटीतील लोकांकडून श्रावणला उपचारासाठीही पैसे मिळत नसून ही बाब लपवली जात असल्याचं त्यांनी सांगितले. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनाही तंबी दिली आहे. अशी घटना एकदा नाही तर अनेकवेळा घडली आहे. फिल्मसिटीमध्ये बिबट्या वारंवार येतो, अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याचंही यावेळी म्हटलं आहे.