Hera Pheri 3 Update: 'हेरा फेरी 3' मध्ये बाबू भैय्यांची एन्ट्री, परेश रावल यांनी स्वतः केला खुलासा
परेश रावल यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत चाहत्यांना 'हेरा फेरी 3' साठी आनंदाची बातमी दिली आहे. 'द हिमांशू मेहता शो' च्या ताज्या भागात त्यांनी 'हेरा फेरी ३' चा ते पार्ट असल्याचे म्हटले आहे.
Hera Pheri 3 Update: परेश रावल यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ते 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) मध्ये बाबू भैय्यांच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहेत. अक्षय कुमार (Akshay Kumar) सह संपूर्ण टीमसोबतचे सर्व वाद आता संपले असल्याच त्यांनी म्हटलं आहे. परेश रावल (Paresh Rawal) म्हणाले, "माझा मुद्दा असा आहे की सर्वांनी एकत्र यावे, चित्रपटासाठी चांगली मेहनत करावी, बाकी काही नाही. सर्व गोष्टींचे निराकरण झाले आहे. गुंता सुटलेला आहे." ते पुढे म्हणाले की, जेव्हा प्रेक्षकांना एखादी गोष्ट इतकी आवडते तेव्हा कलाकारांवर एक विशेष जबाबदारी येते की त्यांनी ती हलक्यात घेऊ नये आणि पूर्ण मेहनतीने काम करावे.
परेश रावल यांच्या एन्ट्रीने 'हेरा फेरी 3' च्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मूळ त्रिकूट - अक्षय कुमार (राजू), सुनील शेट्टी (श्याम) आणि परेश रावल (बाबू भैय्या) यांना पुन्हा पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. बऱ्याच काळापासून हेरा फेरी 3 बद्दल अनेक वाद निर्माण होत होते, विशेषतः कलाकार आणि पटकथेबद्दल, परंतु आता सर्व काही मिटले आहे.
Alia Bhatt PA Fraud: आलिया भट्टच्या माजी सहायिकेने ₹76.9 लाखांची फसवणूक; बेंगळुरूहून अटक
HERA PHERI 3 issue has been resolved.........
Akshay Kumar,Paresh Rawal and Suniel Shetty are back for a Priyadarshan directed HERA PHERI 3 🔥💥 pic.twitter.com/ec0xUbGgjP
— Makya (@ccdx_2) June 29, 2025
'हेरा फेरी 3' मध्ये परेश रावल पुन्हा परतले आहेत:
चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि ही सुपरहिट कॉमेडी फ्रँचायझी पुन्हा काय जादू दाखवेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हेरा फेरीची लोकप्रियता पाहून, चित्रपट निर्माते यावेळी काहीतरी नवीन आणि शक्तिशाली सादर करण्याची तयारी करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)