Baba Siddique यांच्यामुळेच संपला सलमान खान आणि Shah Rukh Khan यांच्यातील संघर्ष, गळाभेट घेऊन मित्रत्वास पुन्हा सुरुवात
राजकीय प्रभाव आणि बॉलीवूड कनेक्शनसाठी ओळखले जाणारे, त्यांच्या निधनाने दोन्ही उद्योगांना धक्का बसला आहे.
ज्येष्ठ राजकीय नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची शनिवारी संध्याकाळी मुंबईत सशस्त्र हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याने राजकीय आणि मनोरंजन या दोन्ही उद्योगांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांचे बॉलिवडू अभिनेते आणि एटरटेन्मेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांशी जवळचे संबंध होते. बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यात असलेला दुरावा, संघर्ष सिद्दिकी यांच्यामुळेच संपुष्टात आला आणि त्यांच्यामध्ये एक नवे मैत्रिपर्व सुरु झाले, असे विशेषत्वाने सांगितले जाते. काय घडले दोघांमध्ये नेमके, घ्या जाणून.
बॉलीवूड कनेक्शन आणि दिग्गज इफ्तार पार्टी
बाबा सिद्दिकी (66) हे केवळ राजकीय व्यक्तीमत्त्व नव्हते. त्याहीपलीकडे त्यांचे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांशी अतिशय घनिष्ठ संबंध होते. मनोरंजन उद्योगातील काही मोठ्या नावांना एकत्र आणणाऱ्या भव्य इफ्तार पार्ट्या आयोजित करण्यासाठी ते अधिक प्रसिद्ध होते. अशाच एका खास पार्टीमध्ये त्यांनी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील कथीत भांडण, संघर्ष असा असलेला वाद मिटवला आणि त्यांच्यात मैत्रिचे पर्व सुरु केले. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले. (हेही वाचा, Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारे लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य? सूत्रांचा दावा)
बाबा सिद्दीकी यांची मध्यस्थी
कथीतरित्या सांगितले जागितले जाते की, अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सन 2008 मध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर पुढचे काही काळ दोघांमध्ये तीव्र संघर्ष सुरु होता. अशाच वेळी जवळपास पाच वर्षांनी म्हणजेच 2013 मध्ये बाबा सिद्दीकी यांनी एक इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी या दोन्ही अभिनेत्यांना निमंत्रण दिले होते. या वेळी त्यांनी सलमानचे वडील सलीम खान यांची आसनव्यवस्था शेजारी शेजारी केली. या वेळी दोघांनी परस्परांना मारलेली मिठी या वादातील अंतर कमी करण्यासमदत करणारी ठरली. पुढे दोन्ही अभिनेत्यांनी याच पार्टीत आपला वाद संपवला आणि नव्या संबंधांना सुरुवात केली. (हेही वाचा, Baba Siddique Murder: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानने बिग बॉसचे शुटींग थांबवले)
इफ्तार पार्टीसाठी सेलीब्रेटींची हजेरी
बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी सेलिब्रेटींच्या उपस्थितीसाठी चर्चेत असे. त्यांनी अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, यांच्यासोबतच संजय दत्त, शिल्पा शेट्टी यांसारख्या स्टार्सची हजेरी असे.
सीद्दीकी यांनी वांद्रे पश्चिममधून सलग तीन वेळा आमदार म्हणून काम केले आणि अन्न आणि नागरी पुरवठा, कामगार आणि FDA राज्यमंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळली. अभिनेता-राजकारणी सुनील दत्त यांच्या जवळच्या संबंधासाठीही ते ओळखले जात होते. या संबंधातूनच त्यांना 1999 मध्ये काँग्रेसचे पहिले तिकीट मिळाले. त्यांची राजकीय कारकीर्द अनेक दशकांहून अधिक काळ पसरली आणि या वर्षाच्या सुरुवातीला सिद्दीकीने शिवसेनेसोबतच्या युतीवरून काँग्रेसशी झालेल्या मतभेदानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) मध्ये सामील होऊन युती केली.
सिद्दीकीच्या निधनाच्या वृत्ताने राजकीय आणि मनोरंजन अशा दोन्ही उद्योगांवर शोककळा पसरली आहे. सलमान खान, संजय दत्त आणि शिल्पा शेट्टी यांच्यासह प्रख्यात बॉलीवूड तारे, त्यांच्या शोक व्यक्त करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी पहिले होते. महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात सिद्दीकीचे योगदान आणि बॉलीवूडमधील एकसंध व्यक्तिमत्व म्हणून त्यांची भूमिका या दोन्ही पक्षांतर्गत राजकारण्यांनी देखील त्यांचे दुःख व्यक्त केले. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, अनेक संशयित आधीच ताब्यात आहेत.